Gautami Kapoor Horrible Experience: अभिनेत्री गौतमी कपूरने टीव्ही मालिकांबरोबरच ओटीटीवर काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गौतमीने शाळेतून येताना बसमध्ये तिच्याबरोबर घडलेली भयंकर घटना सांगितली.

गौतमी कपूरने हॉटरफ्लायला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. गौतमी सहावीत असताना ही घटना घडली होती. गौतमी नेहमीप्रमाणे बसने शाळेतून घरी येत होती. “माझ्या शेजारी बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने माझ्या पँटमध्ये हात टाकला. यामुळे मी गोंधळली. मला समजलंच नाही की माझ्याबरोबर काय घडतंय. मी इतकी लहान होते की माझ्याबरोबर काय घडलंय हे समजायला मला थोडा वेळ लागला,” असं गौतमी म्हणाली.

माणूस पाठलाग करत असल्याची भीती

“मी खूप भीती वाटली, त्यामुळे मी बसमधून खाली उतरले. जवळपास १५-२० मिनिटं मी घाबरलेले होते. तो माणूस माझा पाठलाग तर करत नाहीये ना, अशी भीती मला वाटत होती,” असं गौतमी म्हणाली. घरी गेल्यावर घडलेला प्रकार आईला सांगायची हिंमत होत नव्हती, असं गौतमीने नमूद केलं.

आईने काय सल्ला दिला होता?

गौतमीने मग थोडं धाडस केलं आणि आईला सगळं काही सांगितलं. या प्रसंगानंतर आईने जे सांगितलं ते कायम लक्षात ठेवलं, असं ती म्हणते. “घाबरण्याऐवजी, तू त्याला कानाखाली मारायला हवी होतीस, त्याची कॉलर पकडायला हवी होतीस,” असं गौतमीच्या आईने तिला म्हटलं होतं.

“आईने मला शिकवलं होतं की त्याचा हात घट्ट पकडायचा आणि अजिबात न घाबरता जोरात ओरडायचं. गरज पडल्यास पेपर स्प्रे वापर किंवा पायातले बूट मारण्यासाठी काढायचे,” असा सल्ला आईने दिल्याचं गौतमीने सांगितलं.

‘स्पेशल ऑप्स’ वेब सीरिजमध्ये गौतमीने हिंमत सिंहच्या (केके मेनन) पत्नीची भूमिका केली आहे. या सीरिजमध्ये तिची भूमिका खूपच दमदार आहे. गौतमी कपूर ही अभिनेता राम कपूरची पत्नी आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत.