मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजेच ऋता दुर्गुळे. ‘दुर्वा’या मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. आपल्या अभिनयाच्या जोरावर ऋताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपट, मालिका, नाटकाच्या माध्यमातून ऋताने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर ऋता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान ऋताच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

ऋताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले “जे जे लोक माझं आयुष्य पाहतात आणि त्याबद्दल गॉसिप (चर्चा) करत असतात. त्यांनी अजिबात थांबू नका. कारण माझ्या आयुष्याचा दूसरा भागदेखील लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.” ऋताही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. मात्र, ऋताने ही पोस्टमधून नेमाका कोणावर निशाणा साधलाय याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुक्ता लागली आहे.

अभिनयाबरोबर ऋता आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. पोस्टच्या माध्यमातून ऋता आपले मत परखडपणे मांडताना दिसते. या अगोदरही ऋताने चित्रपटसृष्टीतील खटकणाऱ्या गोष्टींबाबत निर्भीडपणे भाष्य केले होते. आता तिच्या या नव्या पोस्टने अनेक तर्क-वितर्कांना उधाणा आले आहे.

हेही वाचा- Video मुंबईचे ट्रॅफिक टाळण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीने वापरली ‘ही’ युक्ती; व्हिडीओ शेअर करीत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आत्तापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली. ऋताने सध्या मालिकांमधून ब्रेक घेत चित्रपटांवर लक्ष केंद्रित केले आहे. ऋता ‘टाइमपास ३’ ,’अनन्या’ ‘सर्किट’ चित्रपटांमध्ये झळकली आहे.