टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ अल्पवधीतच ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेतून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या मालिकेतील अरुंधतीपासून अनिरुद्धपर्यंत प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता या मालिकेतील आणखी एक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे ते म्हणजे चिमूकली मनू. बालकलाकार जान्हवीने हे पात्र साकारले आहे.

केवळ ७ वर्षाच्या जान्हवीने आपल्या अभिनयाने अनेकांना थक्क केले आहे. प्रेक्षकांकडून तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुकही करण्यात येते. जान्हवीच्या अभिनयाने अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरही भारावून गेली आहे. मधुराणीने सोशल मीडियावर जान्हवीसाठी खास पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

हेही वाचा- Video मुंबईचे ट्रॅफिक टाळण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीने वापरली ‘ही’ युक्ती; व्हिडीओ शेअर करीत म्हणाली…

आपल्या इनस्टाग्रामवर मधुराणीने जान्हवीबरोबरचे झोपाळ्यावर बसलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघी शुटिंगच्या अगोदर सराव करताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले “मनू , अर्थात जान्हवी…काय सुंदर काम करते . आणि रोज आम्हाला थक्क करत असते. जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी. ह्या वयात तिचा तिच्या कामावर असणारा फोकस, निष्ठा ,प्रेम patience , लगन हे सगळं अवाक करणारं आहे. मी नुसतं तिला बघूनच तिच्याकडून किती गोष्टी रोज शिकत असते. मला तिचं कौतुक वाटतंच पण खरं सांगायचं तर तिच्याप्रती एक प्रकारचा आदर वाटतो. आणि ते वाटणं अतिशय गोड वाटतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुराणीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत जान्हवीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. एकाने “जान्हवी अत्यंत प्रतिभावान बालकलाकार आहे, तिचा दमदार अभिनय नेहमीच अवाक करतो.” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “फार गोड आहे ती. छान काम करते.” अशी कमेंट केली आहे.