‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये कार्तिकच्या बहिणीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मोहेना कुमारीने आनंदाची बातमी दिली आहे. मोहेना दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून गरोदरपणाची घोषणा केली आहे. तिने ही पोस्ट केल्यावर चाहते तिचं अभिनंदन करत आहेत.

मोहेनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. मोहेनाला डान्सची खूप आवड आहे. व्हिडीओमध्ये ती ‘जब वी मेट’ चित्रपटातील ‘आओगे जब तुम ओ सजना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये डान्स करत मोहेना तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली.

रीनाने घटस्फोनंतरही आमिर खानच्या कुटुंबाला सोडलं नाही, किरण रावचा खुलासा; म्हणाली, “माझं लग्न झालं तेव्हा ती…”

“माझ्या पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये जेव्हा मी माझा मुलगा अयांश या जगात येण्याची वाट पाहत होते, तेव्हा मी हे गाणं खूप ऐकायचं. गाण्यात दिलेल्या वचनाप्रमाणे सगळं चांगलं होईल या आशेवर. माझ्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या अनुभवानंतर हे शब्द मला अधिक अर्थपूर्ण वाटू लागले. अयांश आमच्या आयुष्यात आला आणि त्याने आमचं आयुष्य अधिक सुंदर बनवलंत. आता मला हे शब्द पुन्हा जिवंत करायचे आहेत, कारण मी पुन्हा माझ्या दुसऱ्या बाळाची वाट पाहत आहे,” असं कॅप्शन मोहेनाने या व्हिडीओला दिलं आहे.

राखी सावंत बुरख्याच्या आत बिकिनी घालून…; फराह खानने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम करणं…”

View this post on Instagram

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहेनाने ही आनंदाची बातमी दिल्यानंतर चाहते तिचं अभिनंदन करत आहेत. मोहेनाने २०१९ मध्ये सुयश रावत यांच्याशी लग्न केलं होतं. तिने २०२२ मध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचं अयांश आहे. मोहना ही रीवाची राजकुमारी असून उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांचे सुपूत्र सुयश यांच्याशी तिचं लग्न झालंय. ‘दिल दोस्ती डान्स’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर ती अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.