स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेच्या कथानकात नेहमीच विविध ट्विस्ट पाहायला मिळाले होते. मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली होती. या मालिकेने तिला घराघरात पोहचवले. समृद्धी अभिनयाच्याबरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकरबरोबर तिचे नाव जोडले जात आहे. यावरच तिने आता भाष्य केलं आहे.

समृद्धी केळकर अभिनयाच्याबरोबरीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते. नुकतीच तिने राजश्री मराठीच्या टुडेस स्पेशल या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा तिला अक्षय केळकरबरोबरच्या नात्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मी पहिले पहिले आमच्यावरचे व्हिडीओ पाहून कोमात गेले होते, माझ्या नातेवाईकांनी, मित्रांनी, आपल्या सिनेसृष्टीतील लोकांनी आमच्या नात्याबद्दल विचारले, त्यावर मी आता उत्तर देते तो माझा खूप चांगला मित्र आहे. जवळपास ५ वर्ष आम्ही मित्र आहोत. मी त्याची बहीण, बायको अशी कोणीच नाहीये.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. दोघांची नुकतीच ‘दोन कटिंग’ ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे.

‘दिल टूटा हैं….” मानसी नाईकचं नवं हिंदी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्री म्हणाली, “खऱ्या आयुष्यावरून…”

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’चा या कार्यक्रमातुन समृद्धी आता एका नव्या रूपात आपल्या भेटीस येत असते. या कार्यक्रमात ती सुत्रसंचालकाच्या भूमिकेत आपल्याला दिसते. अभिनेता अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समृद्धी एक उत्तम अभिनेत्रीच आहेच मात्र ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकारची पदवी घेतली आहे. समृद्धीने याआधी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत भूमिका साकारली आहे. तसेच तिने ‘पुढचं पाऊल’ व ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.