छोट्या पडद्यावरील ‘बस बाई बस’ हा विशेष महिलांसाठी असलेला कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. विविध क्षेत्रातील महिला या शोमध्ये सहभागी होतात. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे. नुकतंच या शोमध्ये मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली.

‘बस बाई बस’ कार्यक्रमात विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना सोनालीने अगदी दिलखुलास पद्धतीने उत्तरे दिली. या शोमध्ये सुबोध भावेने सोनालीला “तुझ्यासमोर इतर अभिनेत्रींचं कौतुक केलेलं आवडतं का?”, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत “हो. मराठी चित्रपटसृष्टीतील कित्येक अभिनेत्री माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांचं कौतुक केलेलं मला फार आवडतं”, असं सोनाली म्हणाली. त्यावर सुबोधने सोनालीला अभिनेत्री राधिका आपटेने तुझी झोप उडवलेली असं आम्ही ऐकलं होतं, असं विचारलं.

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटात सायली संजीवची वर्णी; पहिल्यांदाच साकारणार ऐतिहासिक भूमिका

हेही वाचा >> Video : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘रिक्षावाली’ने लावला बोल्डनेसचा तडका; बिकिनी घालून स्विमिंगपूलमध्ये उतरली अन्…

सुबोध भावेचा प्रश्न ऐकून सोनाली पहिल्यांदा हसली. नंतर ती उत्तर देत म्हणाली, “मी पुण्यात ‘रेस्टॉरंट’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. रात्रीचं शुटिंग संपवून मी घरी येवून गाढ झोपले होते. त्यानंतर एका तासाभरातच आईने मला उठवलं आणि तुझी मैत्रीण आली आहे, असं म्हणाली. मी अर्धवट झोपेतून उठून बघायला गेले तर एक क्यूट मुलगी उभी होती. ती राधिका आपटे होती. आम्ही तेव्हा एकमेकींना ओळखत नव्हतो. तिला मी विचारलं तू कोण आहेस?”.

हेही वाचा >> ‘हाऊसफुल ५’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार, रितेशसह चित्रपटात बॉलिवूड कलाकारांची फौज

“तेव्हा तिने मला मी राधिका आहे आणि संदेश (सोनालीचा नवरा) मला ओळखतो असं सांगितलं. राधिका तेव्हा चित्रपटसृष्टीत नवीन होती. मुंबईत तिला करिअर करण्यासाठी यायचं होतं. यासाठी ती माझं मार्गदर्शन घ्यायला आली होती. तेव्हा राधिकाने केलेल्या धाडसाचं मला कौतुक वाटलं. आज ती जिथे आहे त्याचा मला प्रचंड अभिमान आहे”, असं सोनाली म्हणाली.

हेही पाहा >> Bigg Boss Marathi 4: बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल समृद्धी जाधव बनली ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली कॅप्टन, जाणून घ्या तिच्याबद्दल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे सोनाली गमतीशीरपणे म्हणाली, “त्यानंतरही तिने एकदा माझं मार्गदर्शन घेण्यासाठी मला कॉल केला होता. खरं तर आज मी कॉलर उभी करायला पाहिजे. कारण जेव्हा राधिका स्ट्रगलर होती. तेव्हा ती माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आली होती”.