‘देवों के देव महादेव’ मध्ये पार्वतीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया लग्नबंधनात अडकली आहे. तिने राजस्थानमधील रणथंबोरमध्ये बॉयफ्रेंड विकास पाराशरशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ नवविवाहित जोडपं सुंदर दिसत आहे.

सोनारिका व विकास आज (१९ फेब्रुवारी रोजी) राजस्थानमधील रणथंबोर येथील एका हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नातील मेहंदी व हळदीचे समारंभही याच ठिकाणी पार पडले. कुटुंबिय व जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत या जोडप्याने लग्नगाठ बांधली. सोनारिकाने लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर विकासने ऑफ व्हाइट लंगाची शेरवानी घातली होते.

हळद लागली! राजस्थानमध्ये पार पडला प्रसिद्ध अभिनेत्रीचा हळदी समारंभ, खास फोटो केले शेअर

सोनारिका व विकास यांना सहजीवनासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या जोडप्याने लग्न केलं आहे. दोघांची एका जिममध्ये भेट झाली होती, त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी सात वर्षे एकमेकांसह डेटिंग केलं आणि लग्नाचा निर्णय घेतला.

प्रसिद्ध अभिनेत्रीने एअरलाइन कॅप्टनशी केलं लग्न, राजस्थानमध्ये मराठी लूकने वेधलं लक्ष, पाहा Photos

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनारिकाने काही दिवसांपूर्वीच ती बॉयफ्रेंड विकासशी लग्न करणार असल्याचं जाहिर केलं होतं. तिने डिसेंबर महिन्यात विकासशी साखरपुडा केला होता. विकास सोनारिकाच्या भावाचा मित्र आहे. सोनारिकाला ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर असलेला जोडीदार हवा होता, त्यामुळे तिने विकासशी लग्नाचा निर्णय घेतला.