अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. स्वानंदी अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. मात्र, स्वानंदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राकडे वळली. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून स्वानंदीला खरी ओळख मिळाली. या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. नुकत्याचं एका मुलाखतीत स्वानंदीने तिच्या कुटुंबाबत वक्तव्य केलं आहे. आई-वडील आणि ती एकत्र का राहत नाहीत यामागचं कारण तीने सांगितलं आहे.
हेही वाचा- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने गायली अंगाई, पाहा व्हिडीओ
अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात स्वानंदीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने तिच्या खासगी आयुष्याबरोबरच तिच्या करिअरवरही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. स्वानंदी म्हणाली, “मी. आई आणि बाबा एकत्र राहत नाही. मी आणि बाबा मुंबईत असतो तर आई पुण्यात. पण मुंबईतही आम्ही दोघे एकत्र राहत नाही. कारण माझी आणि बाबांच्या कामाची ठिकाणं वेगवेगळी असतात त्यामुळे मुंबईतही आम्ही वेगवेगळे राहतो. कधी कधी आम्ही तिघे चार चार दिवस एकमेकांशी बोलत नाही. पण तिघांपैकी कुणालाही गरज पडली तर आम्ही जिथे असू तिथून सगळी कामे सोडून एकत्र येतो.”
स्वानंदी पुढे म्हणाली, ” मी लहान असताना आई आणि बाबा कामात खूप व्यस्त असायचे. मी एक महिन्याची असताना आई-बाबांना कामासाठी बाहेर जाव लागलं होतं. त्यामुळे प्रत्येकवेळी एकमेकांना भावनिक साथ देणं शक्य नव्हतं. माझ्या आई-वडिलांनीच मला काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवायची शिकवण त्यांनी दिली.”
स्वानंदीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका दिल दोस्ती दुनियादारमध्ये स्वानंदीने मिनलची भूमिका साकारली होती. ही मलिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर स्वानंदी ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गायनाच्या कार्यक्रमाचे स्वानंदीने विजेतेपद पटकावले आहे. तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे.