scorecardresearch

तब्बल १४ महिन्यांनी विशाखा सुभेदार यांनी लता मंगेशकरांनी दिलेल्या साडीची घडी मोडली, म्हणाल्या “हे वस्त्र…”

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कायम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहायच्या.

Vishakha Subhedar lata mangeshkar

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमातील कलाकारांच्या अभिनयाचे अनेक सेलिब्रिटीही चाहते आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकरही चाहत्या होत्या. नुकतंच अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी लता मंगेशकरांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कायम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहायच्या. या कार्यक्रमाच्या त्या फार मोठ्या चाहत्या आहेत. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांचे विनोद त्यांना प्रचंड आवडायचे. लता मंगेशकर यांनी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांच्यासाठी एक खास भेटवस्तू पाठवली होती. यात त्यांनी विशाखा सुभेदार यांच्यासाठी दोन साड्या पाठवल्या होत्या. लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने विशाखा सुभेदार यांनी एक साडी परिधान करत फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : “…अन् दोन सेकंद काळजात धस्स झालं”, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची भावनिक पोस्ट

विशाखा सुभेदार यांची पोस्ट

“आज हा फोटो माझा नाही तर ह्या मी नेसलेल्या साडीचा आहे…हे वस्त्र नाही हा आशीर्वाद आहे..
भारतरत्न, गानकोकिळा. लता मंगेशकर.. ह्यांचा.

हास्यजत्रेमधलं उर्दू गायिका, हे पात्र निभावलेले ते स्किट त्यांना प्रचंड आवडलं, त्या म्हणाल्या तू उर्दू बोललीयस ते फार छान बोललीयस.. मी सुद्धा अनेक उर्दू शब्द गायलेयत,त्यांचे उच्चार अवघड असतात. तू खरच खुप छान जमवलंस. आणि त्यांनीही नाटकात काम केलं त्या वेळेस झालेली गंमत देखील सांगितली.त्यांनी शाबासकी म्हणून हा आशीर्वाद दिला. covid प्रकरण निवळलं किं आम्ही भेटायला जाणार होतो पण… दुर्दैव.राहून गेलं.
त्या आपल्यात नाहीयत पण त्यांचा आवाज आपल्याला जिवंत ठेवतो..! अंगाई ते म्हातारपण सगळ्या वयाशी त्यांचा आवाज त्यांची गाणी connect होतात. आणि त्या सर्वश्रेष्ठ बाईंचा, लतादीदींचा,आम्हाला फोन आला..!

त्यांनी फोन वर केलेल्या गप्पा आजही माझ्या कानात आहेत.. तो दिवस न विसरण्यासारखा होता.ही साडी अंगावर नेसताना काय वाटत होत ते मी शब्दात नाही सांगू शकत..देवाचे आभार मानले, लताबाईंचे नाव घेतले त्यांना सांगितलं “तुम्ही दिलेली साडी नेंसतेय.”आणि Samir Choughule , Sachin Mote, Sachin Goswami हास्यजत्रेचे Amit Phalke चे सुद्धा आभार मानले.ह्या सगळ्यांमुळेच हे आशीर्वाद रुपी वस्त्र मला मिळाले.
आज लतादीदींचा स्मृतीदिन…”, असे विशाखा सुभेदार यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : लता मंगेशकरांकडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कौतुक, समीर चौगुले म्हणतात, “दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि…”

दरम्यान भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर यांना स्वर्गवासी होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय. आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला. लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या लतादीदींची आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कलाकार मंडळी त्यांना अभिवादन करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:20 IST