अभिनेता अक्षय केळकरने नुकतंच त्याची प्रेयसी साधना काकतकरबरोबर लग्न केलं. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते; तर काही दिवसांपूर्वीच अक्षयने त्याच्या प्रेयसीबरोबरचे फोटो शेअर करत सोशल मीडियावरून त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. ९ मे रोजी अक्षय-साधना यांनी लग्न केलं. अक्षयने त्याच्या लग्नापूर्वीच्या तयारीची माहिती त्याच्या ब्लॉगमार्फत दिली होती, तर सोशल मीडियावर तो सक्रिय असल्याने अनेकदा ब्लॉगमार्फत त्याच्या आयुष्यातील घडामोडी तो शेअर करत असतो.

लग्न झाल्यानंतर अक्षयने एक व्लॉग शेअर केला होता. अक्षय केळकरने शेअर केलेल्या व्लॉगमध्ये त्याची बायको साधनाच्या पाठवणीचे काही क्षण पाहायला मिळत आहेत. यावेळी साधनाला निरोप देताना तिच्या माहेरची मंडळी भावूक झालेली पाहायला मिळाली, तर साधनाच्या आईला अश्रू अणावर झाले होते. यावेळी अक्षयची आईदेखील भावूक होताना दिसली.

अक्षयने नुकताच ३०मे ला अजून एक व्लॉग शेअर केला असून यामध्ये अक्षय-साधना अक्षयच्या घरी आलेले दिसत आहेत. यावेळी त्यांच्या गृहप्रवेशाची तयारी सुरू असलेली पाहायला मिळते. अक्षयच्या घरी साधनाचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी अभिनेत्याच्या बहिणीने तिच्या दादा-वहिनीला उखाणा घ्यायला सांगितला. गृहप्रवेश करताना अक्षयने साधनासाठी घेतलेल्या उखाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. यावेळी अक्षयने साधनासाठी “साधना घरी येणार म्हणून मी स्वत: धुतली या घरची लादी, साधना टेंशन घेऊ नको पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लागला की, मी फिरवणार काश्मीरची प्रत्येक वादी.” असा उखाणा घेतला आहे.

अक्षयने उखाणा घेतल्यानंतर साधनानेही त्याच्यासाठी उखाणा घेतला आहे. अक्षयसाठी साधनाने, “काकतकरांची लेक झाली केळकरांची सून, अक्षयरावांचं नाव घेते गृहप्रवेश करून.” असं म्हणत उखाणा घेतला. यानंतर साधनाने पारंपरिक पद्धतीने अक्षयच्या घरामध्ये गृहप्रवेश केलेला पाहायला मिळाला. यावेळी अक्षयचे कुटुंबीय, त्याचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय केळकर व साधना काकतकर यांनी ९ मे रोजी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. हा त्यांचा प्रेमविवाह होता. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षय-साधनाच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.