सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सतत घडणारी उलथा पालथ आपल्याला काही नवीन नाही. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून बाहेर पडल्याची तर सगळीकडेच र्चा सुरू आहे. ‘झी मराठी’वरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या चॅट शोमध्येही सध्या राजकीय वर्तुळातील दिग्गज मंडळी हजेरी लावून त्यावर भाष्य करताना दिसत आहेत.

नुकतंच राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. या भागाचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नव्या भागात अमोल कोल्हे अभिनय क्षेत्र आणि राजकारण याबद्दल भरभरून बोलले. शिवाय शरद पवार आणि त्यांच्या राजकीय करकीर्दीविषयीही त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या.

आणखी वाचा : प्रभासची जादू कायम; ‘आदिपुरुष’ ठरला फ्लॉप पण ‘सलार’ प्रदर्शनाआधीच कमावणार ‘इतके’ कोटी

या कार्यक्रमात अवधूत गुप्तेने अमोल कोल्हे यांना शरद पवारांबद्दल काही गोष्ट विचारल्या. जातीचं राजकारण शरद पवारांनी महाराष्ट्रात आणलं असं राज ठाकरे यांनी म्हंटल्याची आठवण जेव्हा अवधूतने करून दिली तेव्हा अमोल कोल्हे म्हणाले, “पावर साहेबांनी जातीचं राजकारण आणलं असं कुणी म्हणत असेल, तर त्याच पवार साहेबांनी जेव्हा ३३% महिलांचं आरक्षण सुरू केलं तेव्हा त्यांनी हा विचार केला नाही की ती महिला कोणत्या जातीची असणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अमोल कोल्हे म्हणाले, “ज्या पवार साहेबांनी हिंजेवाडीत आयटी पार्क स्थापन केलं, तेच बांधल्यावर आज २० वर्षांचा आयटी प्रोफेशनल विचारतोय शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? ज्या माणसाने हे सगळं आणलंय त्याबद्दल आपण असं म्हणणार आहोत का?” अमोल कोल्हे यांनी या संपूर्ण कार्यक्रमात अशीच धमाल उत्तरं दिली. शरद पवारांबद्दल अमोल कोल्हे यांचं हे वक्तव्य ऐकल्यावर आता या आगामी भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.