अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये दोघांची अनेकदा भांडणं होताना दिसतात. अंकिता या शोमध्ये तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसली. तिने सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर तिची अवस्था कशी झाली होती, याबाबत खुलासा केला आहे.

“हे पटत नाहीये…” निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत; म्हणाली, “पूर्वीचा…”

अंकिता नावेदशी बोलताना म्हणाली की सुशांतबरोबर ब्रेकअपनंतरचा काळ हा तिच्यासाठी सर्वात कठीण टप्पा होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला अडीच वर्षे लागली. खरं तर, त्या टप्प्यात विकी तिचा जवळचा मित्र होता. ती विकीला नेहमी सांगायची की सुशांत तिच्याजवळ परत येईल आणि ती सुशांतच्या परत येण्याची वाट पाहील. ती सुशांतबरोबर बराच काळ नात्यात होती, त्यामुळे ब्रेकअपनंतर पुढे जाणे तिच्यासाठी खूप कठीण होते.

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

अंकिता पुढे म्हणाली की सुशांतने मूव्ह ऑन केलं, त्यामुळे आपली तशी अवस्था झाली, मी मूव्ह ऑन करू शकले नव्हते. मी पुढे जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु ते जमलं नाही. मी स्वत: ला दुसर्‍या कोणाला डेट करण्याची कल्पना करू शकत नव्हती. तो काळ खूप त्रासदायक होता, असं अंकिताने नावेदला सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विकी माझा मित्र होता आणि मी त्याला डेट करण्याचा कधी विचारही केला नव्हता. मी मूव्ह ऑन केल्यानंतर एकेदिवशी विकीने मला लग्नासाठी प्रपोज केलं. विकी आयुष्यात आल्यानंतर गोष्टी बदलल्या,” असं अंकिताने नमूद केलं. दरम्यान, काही वर्षे डेट केल्यानंतर अंकिता व विकी दोन वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले.