‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा प्रवास अखेर काल, २८ जानेवारीला संपला. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी हा प्रवास सुरू झाला होता. १०० दिवसांच्या या प्रवासानंतर काल ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित करण्यात आला. मुनव्वर फारुकी हा ‘बिग बॉस १७’चा विजेता ठरला. तर अभिषेक कुमार हा उपविजेता ठरला. पण अंकिता लोखंडेचा निकाल प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा धक्का होता.

अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे टॉप पाच सदस्य महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. सुरुवातीला अरुण माशेट्टी ‘बिग बॉस १७’च्या विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर झाला. त्यानंतर अंकिता लोखंडेचा प्रवास संपल्याचं सलमान खानने जाहीर केलं; जे सर्वांसाठी मोठा धक्का देणार होतं. अंकिताचे अनेक चाहते आता नाराजी व्यक्त करत आहेत. अंकिताची जाऊबाई रेशू जैनने देखील नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून बाद, अमृता खानविलकने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या पेजवर रेशू जैनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेशूला ‘बिग बॉस १७’च्या निकालाबद्दल विचारलं जातं. तेव्हा अंकिताची जाऊबाई म्हणते, “मला अजूनही वाटतं, पहिली किंवा दुसरी अंकिता पाहिजे होती. पण हे खूप चुकीचं आहे. अंकिता पहिली किंवा दुसरी येईल, असंच मला वाटतं होतं.”

हेही वाचा – Bigg Boss 17 Grand Finale: सलमान खानने अनुराग डोभालची उडवली खिल्ली, म्हणाला, “आज जर तो इथे असता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिता पती विकी जैनबरोबर ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झाली होती. पहिल्या दिवसापासून दोघांच्या नात्याची वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सतत दोघं भांडताना दिसले. पण तरीही दोघांनी या खेळात एकमेकांची साथ कधी सोडली नाही.