हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडे ओळखली जाते. आजही अनेक जण तिला ‘पवित्र रिश्ता’ मधील अर्चना म्हणून ओळखतात. अंकिता कायम चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. कधी अभिनय क्षेत्रातील कामामुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत असते. सध्या अंकिता ‘लाफ्टर शेफ सीझन २’मध्ये पाहायला मिळत आहे.

सध्या या कार्यक्रमाचं मुंबईत चित्रीकरण सुरू असून कार्यक्रमाच्या पुढील भागांच्या चित्रीकरणासाठी अंकिता मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळाली. यावेळी अंकितानं निळ्या रंगाची साडी नेसली असल्याचं पाहायला मिळालं. निळ्या रंगाच्या साडीवर साजेसे पारंपरिक मराठमोळे दागिने तिनं परिधान केल्याचे दिसले. अंकिताचा हा लूक पाहून तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिच्या लूकचं कौतुक केलं.

यावेळी अंकिता पापाराझींशी संवाद साधताना म्हणाली, “माहीत नाही कुणाचं लग्न आहे; पण मला असं वाटतं की, माझं रोजच लग्न आहे.” त्यामुळे सध्या अंकिताच्या या मराठमोळ्या लूकचं विशेष कौतुक होताना दिसतं. पुढे अंकिता पापाराझींना जय महाराष्ट्र म्हणून कार्यक्रमाच्या सेटकडे जाताना दिसली. अंकिता बऱ्याचदा स्पॉट झाल्यानंतर पापाराझींसह मराठीत बोलताना दिसते.

‘लाफ्टर शेफ सीझन २’ या कार्यक्रमामध्ये अंकितासह तिचा नवरा विकी जैन ही पाहायला मिळाला. याव्यतिरिक्त करण कुंद्रा, कृष्णा अभिषेक, अली गोनी, निया शर्मा व रीम शेख हे कलाकारही पाहायला मिळत आहेत. तर या कार्यक्रमामध्ये अंकिता, विकी, करण, कृष्ण यांची जुगलबंदी पाहायला मिळते. कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान ही कलाकार मंडळी धमाल-मस्ती करताना दिसतात. त्या संदर्भातील त्यांचे रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिता लोखंडे बिग बॉस सीझन १७ या शोमध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती रणदीप हुडासह ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात झळकली होती. तसेच ती ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाशी’, ‘बागी ३’ यांसारख्या चित्रपटांमधूनही पाहायला मिळाली होती. सध्या अंकिता ‘लाफ्टर शेफ सीझन २’मध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर ती कोणत्या नवीन भूमिकेत पाहायला मिळणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे.