ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांचं सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यांचे पार्थिव आज मुंबईतील वर्सोवा, अंधेरी येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ऋतुराज सिंह हे टीव्हीवरील दिग्गज अभिनेते होते, त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी टीव्ही कलाकार पोहोचले.

ऋतुराज सिंह यांच्यावर आज (२१ फेब्रुवारी) ओशिवरा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली होती. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनाठी घरी ठेवण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अभिनेता नकुल मेहता, हितेन तेजवानी व गौरी, अनूप सोनी पोहोचले. त्यांनी अंत्यदर्शन घेत ऋतुराज सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कलाकार भावुक झाले होते.

अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदय बंद पडल्याने निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऋतुराज सिंह यांचं हृदय बंद पडल्याने निधन झालं. “ते आजारी होते. स्वादुपिंडाशी संबंधित काही समस्यांमुळे १५ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ते घरी परतले होते, पण काल त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हृदय बंद पडल्याने त्यांचं निधन झालं,” अशी माहिती त्यांचे मित्र व अभिनेते अमित बहल यांनी दिली होती.