अर्चना पूरण सिंह या हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पूरण सिंह सध्या चर्चेत आहेत, कारण त्यांनी ट्रोलर्सना दिलेले उत्तर. अभिनेत्री अनेकदा त्यांच्या आयुष्याशी आणि कुटुंबाशी संबंधित क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांच्या एका पोस्टवर एका वापरकर्त्याने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, ज्यावर त्यांनी चांगलंच उत्तर दिलंय. चला जाणून घेऊया, असे काय झाले की अभिनेत्रीला राग आला.
अभिनेत्रीच्या कुटुंबाला केले ट्रोल
अर्चना पूरण सिंह यांना कपिल शर्मासारख्या कॉमेडी शोसाठी ओळखले जाते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि त्यांच्या कुटुंबाबरोबरचे त्यांचे अनुभव त्या शेअर करत असतात. या अभिनेत्रीने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये एका वापरकर्त्याने त्यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. वापरकर्त्याने लिहिले, “फक्त शैक्षणिक माहितीसाठी, तुमचे दादू आणि नानी एकत्र का राहत आहेत? ते वृद्धाश्रम आहे का?”
युजरने विचारलेला प्रश्न अर्चना पूरण सिंह यांना आवडला नाही आणि त्यांनी त्यावर जोरदार उत्तर दिले. इतकेच नाही तर त्यांनी या उत्तराचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या शैक्षणिक ज्ञानासाठी सांगू, हे वृद्धाश्रम नाही, हे एक भारतीय घर आहे. मी तुम्हाला भारतीय घराची व्याख्या सांगते, ते असे ठिकाण आहे जिथे वृद्धांना प्रेम आणि आदर दिला जातो आणि त्यांना कुटुंबाच्या जवळ ठेवले जाते.”

अर्चना पूरण सिंह यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या शेवटच्या शौना गौतम दिग्दर्शित ‘नादानियां’ चित्रपटात दिसल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी श्रीमती ब्रागांजा मल्होत्राची भूमिका केली होती. चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करण्याबरोबरच अर्चना पूरण सिंह टीव्हीच्या दुनियेतही सक्रिय आहेत. ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ या कॉमेडी शोमध्ये त्या जज म्हणून ओळखल्या जातात. त्या आता ‘कपिल शर्मा कॉमेडी शो’च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहेत, जो २१ जूनपासून प्रसारित होणार आहे.