‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. अल्पवधीच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस आणखीन रोमांचकारी होताना दिसत आहे. अशातच ही मालिका आता नव्या वळणावर येऊन पोहचली आहे.

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अस्तिकाला चक्कर येत असल्याचे दिसून येत आहे. चक्कर आल्यामुळे तिला त्रास होत आहे. आस्तिकाची अशी अवस्था बघून फाल्गुनी खूप घाबरते व ती घरातल्या अद्वैत, रुपाली व सगळ्यांना जोरजोरात आवाज देते. अस्तिकाची ही अवस्था बघून घरातील सगळेच घाबरतात. मात्र, हा प्रोमो प्रेक्षकांना आवडलेला दिसून येत नाहीये. अनेकांनी या प्रोमोच्या व्हिडीओवर नकारात्मक कमेंट केल्या आहेत.

Saatvya Mulichi Saatvi Mulgi Netra will kill astika director opened up about upcoming twists in serial
“अस्तिकाचा वध नेत्राच्या हातून…”; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या दिग्दर्शकांनी केला खुलासा
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
shivani rangole shares birthday wish post for her mother
सासूबाई मृणाल कुलकर्णी, तर शिवानी रांगोळेच्या आईला पाहिलंत का? वाढदिवशी शेअर केले खास फोटो
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

एकाने कमेंट करत लिहिले, फालतू करून सोडली मालिका. उत्तम होती आधी. आता शेवट काय दाखवणार हे त्रिनयना देवीलाच माहिती. दुसऱ्याने लिहिले, “अतिशय थर्डक्लास मालिका, फालूत दिग्दर्शक, रटाळ अभिनय” तर अनेकांनी मालिकेत नेत्राला परत आणण्याची मागणी केली आहे. एकाने लिहिले काहीही करून नेत्राला मालिकेत परत आणा. आता आम्हाला नेत्राला मालिकेत पाहायचे आहे”. तर दुसऱ्याने नेत्राची आता खूपच आठवण येत आहे, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याचा अशोक सराफ यांच्या हस्ते सन्मान; म्हणाला, “दहा वर्षांनी…”

दरम्यान या मालिकेत नेत्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडे काही दिवसांपूर्वीच खऱ्या खुऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली. त्यामुळे तितीक्षा काही दिवसांसाठी सुट्टीवर गेली होती. आता पुन्हा कामावर परतली आहे. मालिकेतील इतर कलाकारांनी तिचे सेटवर जोरदार स्वागतही केले होते.