मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्ते याला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. अवधूतच्या गाण्यांनी मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. यानंतर अवधूत गुप्तेने दिग्दर्शनात नशीब आजमावलं. तिथेसुद्धा त्याला प्रचंड यश मिळालं. ‘झेंडा’, ‘मोरया’सारखे चित्रपट अवधूत गुप्तेने दिले. नंतर मात्र एक चित्रपट आपटल्याने त्याने दिग्दर्शनापासून फारकत घेतली. याबरोबरच अवधूत गुप्तेचा एक मराठी टॉक शो चांगलाच लोकप्रिय झाला होता.

‘खुपते तिथे गुप्ते’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. पहिले दोन सीझन यशस्वीरित्या पार पडल्यानंतर मधली काही वर्षं हा कार्यक्रम बंद होता. आता मात्र या शोच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच ‘खुपते तिथे गुप्ते’चं नवं पर्व सुरू होणार आहे. झी मराठी आणि अवधूत गुप्तेने सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.

आणखी वाचा : “अल्लाह हा एकमेव…” धर्मांतर केलेल्या ३२,००० महिलांची कहाणी; ‘द केरळ स्टोरी’चा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित

“प्रश्नांची धार वाढणार…आता खुपणार नाही तर टोचणार…” अशी टॅगलाइन असलेला प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल १० वर्षांनी हा अफलातून कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने सगळेच प्रेक्षक यासाठी उत्सुक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच या नव्या पर्वाचं एक खास आकर्षण असणार आहे ती म्हणजे एक खुर्ची. या खुर्चीसाठी होणारी चढाओढ या कार्यक्रमात बघायला मिळणार आहे. गेल्या पर्वात बऱ्याच मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी, नेत्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांना खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण आता या नव्या पर्वातील सेलिब्रिटीजना फक्त खुपणारच नाहीत तर हे प्रश्न चांगलेच टोचणार आहेत. इतकंच नव्हे तर या पर्वाची सुरुवात्र श्रेयस तळपदेपासून व्हायला हवी अशी इच्छादेखील काही लोकांनी व्यक्त केली आहे.