एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाणारे अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांची जोडी नेहमी चर्चेत असते. गेली अनेक वर्षं हे दोघेजण विविध कलाकृतींमधून उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ घालत आले आहेत. २७ वर्षांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली. ऐश्वर्या नारकर यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा अविनाश यांच्या मनात काय भावना होत्या हे त्यांनी एका रीलमधून सांगितलं आहे.

अविनाश नारकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे विविध रील पोस्ट करते ट्रेंड फॉलो करत असतात. आता त्यांनी नुकतंच त्यांचं शेअर केलेलं एक रील चांगलंच चर्चेत आलं आहे.

women raped in Bopdev Ghat Pune
Bopdev Ghat Crime : “तरुणाला बांधलं आणि त्यानंतर २१ वर्षांच्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार..”, पोलिसांनी सांगितला बोपदेव घाटातला घटनाक्रम
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Young murder by father Dadar, murder Dadar,
दादरमध्ये वृद्ध पित्याकडून तरुणाची हत्या
Jagan Mohan Reddy
Tirupati Laddu Row : “आधी धर्म सांगा मग तिरुपतीचं दर्शन घ्या”, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती दर्शनाचा बेतच रद्द केला
Union Minister L Murugan visited the youth home
“त्यांनी माझ्या मुलाचं जानवं कापलं आणि म्हणाले पुन्हा…”, दिव्यांग मुलाच्या वडिलांची तक्रार; तमिळनाडू पोलिसांनी मात्र दावा फेटाळला
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…
BAPS Swaminarayan Temple
न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा, भारतीय दुतावासाने नोंदवला तीव्र निषेध

आणखी वाचा : Video: अविनाश नारकरांना ट्रोल करणाऱ्यांना पत्नी ऐश्वर्या यांनी सुनावले खडेबोल, म्हणाल्या, “तो माणूस म्हणून…”

अविनाश नारकर यांनी त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांच्या पाठीमागे ऐश्वर्या नारकर यांचा एक फोटो दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते ‘पहिल्यांदा’ या गाण्याच्या बोलावर लिपसिंक करताना दिसत आहेत. “बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा, मनामधे गुदगुल्या पहिल्यांदा, स्लो मोशन झालंय पहिल्यांदा पहिल्यांदा…” असे या गाण्याचे बोल ते म्हणत आहेत.

हेही वाचा : “तुमच्या कपाळावर कसली खूण आहे?” अखेर ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा, म्हणाल्या…

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, “२७ वर्षे झाली…वेळ कसा पटपट निघून जातो. आठवणी निर्माण करा…आयुष्य एन्जॉय करा. मी ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा माझंही असंच काहीसं झालं होतं. आईशप्पथ!” तर त्यांच्या या रीलवर कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांनीही हे रील आवडल्याचं सांगत अविनाश यांच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.