अविनाश सचदेव हा एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत टीव्ही मालिका व रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. पण तो त्याच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिला. त्याने अनेक टीव्ही अभिनेत्रींना डेट केलं आहे. अविनाश सचदेवचे नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींशी जोडले गेले आहे.
‘छोटी बहू’ या मालिकेत अविनाश सचदेव व रुबीना दिलैक यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत काम करतानाच ते जवळ आले. दोघे प्रेमात पडले आणि काही काळ ते रिलेशनशिपमध्ये राहिले. पण मालिका संपल्यानंतर दोघेही वेगळे झाले. रुबीना दिलैकबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अविनाश सचदेवने २०१३ मध्ये ‘इस प्यार को क्या नाम दूं? एक बार फिर’ या मालिकेत काम केले होते.
या मालिकेत अविनाशने श्लोक अग्निहोत्रीची भूमिका केली होती. तर, शाल्मली देसाईने सोजल अग्निहोत्री नावाचे पात्र साकारले होते. शाल्मली अविनाशच्या वहिनीच्या भूमिकेत होती. शाल्मली अविनाशची मानलेली बहीण होती. तो तिला बहीण म्हणायचा. पण मालिकेत काम करत असतानाच नंतर अविनाश व शाल्मली जवळ आले. त्यांच्यात मैत्री झाली, पुढे ते दोघे प्रेमात पडले आणि काही काळ एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर अविनाश व शाल्मली यांच्यातील वाढत्या तणाव आणि मतभेदांमुळे त्यांचं नातं तुटलं आणि २०१७ मध्ये दोघेही विभक्त झाले. शाल्मलीपासून विभक्त झाल्यानंतर काही वर्षांनी अविनाश बिग बॉसमध्ये सहभागी झाला. बिग बॉसच्या घरात असताना तो अभिनेत्री फलक नाजच्या प्रेमात पडला. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं. आता अविनाश सिंगल आहे.
कोण आहे शाल्मली देसाई?
शाल्मलीने छोट्या पडद्यावर बरंच काम केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक लेखिका देखील आहे. शाल्मली २०१२ मध्ये यूटीव्ही स्टार्सच्या रिअॅलिटी शो लक्स द चोजनन वनची विजेती ठरली होती. शाल्मली कथ्थक नृत्यांगना आणि गोल्फर देखील आहे. ‘इस प्यार को क्या नाम दू २’ मध्ये काम करून तिने अभिनयात पदार्पण केलं होतं. २०१६ मध्ये ‘थपकी प्यार की’ या मालिकेची ती लेखिका होती. तिने ‘एक आस्था ऐसी भी’, ‘एक हसीना थी’, ‘एनकाउंटर’, ‘गुलमोहर ग्रँड’ आणि ‘थपकी प्यार की’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.