छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री बरखा बिष्टने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने पती इंद्रनील सेनगुप्तापासून घटस्फोट घेत आहे. लग्नानंतर १३ वर्षांनी टीव्हीवरील या लोकप्रिय जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. या दोघांना एक मुलगी असून बरखा एकल माता म्हणून तिचा सांभाळ करत आहे.

हेही वाचा – कुमार सानूंच्या मुलीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा खुलासा करत म्हणाली…

‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत बरखा बिष्टने पती इंद्रनीलसोबतच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलंय. अभिनेत्री म्हणाली, “हो, आम्ही लवकरच घटस्फोट घेणार आहोत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक आहे. आपल्या ११ वर्षांच्या मुलीबरोबर मी आयुष्यात पुढे जात आहे. मी एकल माता (सिंगल मदर) आहे आणि मीरा ही माझी प्राथमिकता आहे. मी ओटीटीवर चांगले काम करत आहे. तसेच मी टीव्ही आणि चित्रपटांमधील चांगल्या प्रकल्पांसाठी नेहमीच तयार असते.”

दरम्यान, बरखाने इंद्रनीलपासून विभक्त होण्यामागचे कारण सांगितलेले नाही. तिने याचे कारण सांगण्यासही स्पष्ट नकार दिला आहे. दोन वर्षांपूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात होतं की इंद्रनीलचे बंगाली अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. पण याबद्दल बरखाने बोलणं टाळलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बरखा व इंद्रनीलची पहिली भेट २००६ मध्ये ‘प्यार के दो नाम… एक राधा एक श्याम’ च्या सेटवर भेटले होते. एकत्र काम करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी २००७ मध्ये लग्न केलं होतं.