छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी अत्रेच्या पतीचं पियुष पुरे यांचं एप्रिल २०२५ रोजी निधन झालं. पियूष पुरे यांचे लिव्हर सिरोसिसमुळे निधन झाले. निधनापूर्वी काही काळ ते आजारी होते. अशातच शुभांगीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या पतीबद्दल सांगितलं आहे. पतीच्या आठवणीत ती भावूक झाली आहे.

‘विरल भयानी’सह संवाद साधताना शुभांगीने पियुष यांच्याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “पियुषचं निधन खूप दुर्दैवी होतं. त्याला असलेल्या व्यसनामुळे हे झालं असं मला वाटतं. डॉक्टरांनी खूप आधीच सांगितलं होतं की जर त्याने व्यसन कमी केलं नाही तर कदाचित त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मला याबाबत माहीत होतं; पण हे इतक्यात घडेल असं वाटलं नव्हतं. मला त्याला सर्व चांगल्या गोष्टींसाठी लक्षात ठेवायचं आहे. मी त्याच्यावर प्रेम केलं, त्यामुळे मी त्याला कदाचित कधीच विसरू शकणार नाही. माझी अशीच इच्छा आहे की त्याने आमच्या मुलीला आशीर्वाद देत राहावे. आम्हा दोघींना मार्गदर्शन करावं.” शुभांगी अत्रेचे दिवंगत पती पियुष पुरे यांना जाऊन दीड महिन्यांचा काळ लोटला आहे.

शुभांगीने पियुष पुरेसह २००३ साली लग्न केलं होतं. लग्नानंतर अनेक वर्षे या दोघांनी एकमेकांसह संसार केला. पुढे कालांतराने दोघांच्या नात्यात कटुता आली होती, पण त्यांची मुलगी अशीसाठी या दोघांनी घटस्फोट न घेता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, नंतर या दोघांनी शेवटी फेब्रुवारी २०२५ ला घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी पियुष पुरे यांचं निधन झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शुभांगीने अभिनेत्री शिल्पा शिंदेला रिप्लेस केल होतं. सुरुवातीला तिच्या मालिकेतील कामामुळे प्रेक्षक आनंदी नव्हते, पण नंतर हळू हळू तिने या मालिकेतली अंगुरी भाभीच्या भूमिकेतून चांगली कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.या मालिकेसह तिने ‘कसोटी जिंदगी की’, ‘कस्तुरी’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.