लोकप्रिय पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा मुलगा अखिलेश भगरेचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. ग्रहयज्ञ, हळद, साखरपुडा, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक अखिलेशचं लग्न झालं. अखिलेशने वैष्णवी जाधव हिच्याशी लग्नगाठ बांधली. याचे फोटो आणि व्हिडीओ अखिलेशची बहिणी म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री अनघा अतुल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी तिच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामधल्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात भावाच्या म्हणजेच अखिलेश भगरेच्या लग्नाची सुपारी फुटल्याची आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. “चला सुपारी फुटली एकदाची. अभिनंदन अखिलेश आणि वैष्णवी. तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम”, असं लिहित तिने दोघांचा सुंदर फोटो शेअर केला होता.

हेही वाचा – कपाळावर टिकली नव्हती म्हणून वंदना गुप्तेंनी…; सुलेखा तळवलकरांनी सांगितला स्वतःच्या लग्नातला किस्सा, म्हणाल्या, “माझी सासूबाई इतकी उतावळी…”

त्यानंतर मे महिन्यात अखिलेश भगरेच्या लग्नाचा मुहूर्त ठरला. हा मुहूर्त समारंभ घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. यावेळी अनघा तिच्या कुटुंबाबरोबर ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी अखेर अनघाचा भाऊ बोहल्यावर चढला. अखिलेशने वैष्णवी जाधवशी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

हळद, साखरपुडा, संगीत, सप्तपदी आणि वरात याचे व्हिडीओ अखिलेश भगरेच्या मित्र मंडळीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच अनघाने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केले आहेत. अखिलेश भगरेच्या लग्नातील या अनसीन व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Video: “तुरू तुरू चालू नको…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील पुड्या आणि राजश्रीचा जबरदस्त डान्स, सूर्यादादा म्हणाला…

दरम्यान, गेल्या वर्षी अनघाने अखिलेश साथीने पुण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलचं नाव असून भावा-बहिणीने सुरू केलेल्या या हॉटेलला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठीतील बरेच कलाकार अनेकदा ‘वदनी कवळ’ हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना दिसत असतात. अनघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘स्टार प्रवाह’च्या ‘रंग माझा वेगळा’नंतर ती ‘कलर्स मराठी’च्या ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने मनालीची भूमिका साकारली होती. आता लवकरच ती नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचा – लेक-जावयासाठी परिणीती चोप्राच्या आईने रेखाटलं सुंदर चित्र, राघव चड्ढा सासूबाईंना म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शिकायला गेलो एक’ या नाटकात अनघा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अद्वैत दादरकर लिखित-दिग्दर्शित ‘शिकायला गेलो एक’ नाटकात अनघाबरोबर अभिनेते प्रशांत दामले, हृषिकेश शेलार, सुशील इनामदार, समृद्धी मोहरीर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. १३ डिसेंबरला हे नाटक रंगभूमी येणार आहे.