‘भाग्यलक्ष्मी’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता आकाश चौधरीवर चाहत्याने हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते संताप व्यक्त करत आहेत. सुरुवातीला काही जण त्याच्याजवळ फोटो काढायला आले, आकाशने त्यांच्याबरोबर फोटो काढला. त्यापैकी एकाजवळ पाण्याची बाटली होती, ती त्याने आकाशवर उगारली.

दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष

आकाश चौधरीने आधी त्यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर झालं म्हणत तो तेथून जायला निघाला. तो काही पावलं चालताच एकाने त्याच्या दिशेने प्लास्टिकची बाटली फेकली, जी त्याच्या पाठीला लागली. अचानक पाण्याची बाटली लागल्याने आकाशलाही कळलं नाही की नक्की काय झालंय, त्यानंतर तो चिडला आणि त्यांना मुर्ख म्हणाला.

हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “काही लोकांना कसं वागायचं याचं अजिबात भान नसतं. असे चाहते असण्यापेक्षा चाहते नसलेले बरे. मुर्ख लोक.” तर दुसऱ्याने पोलिसांनी त्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता आकाश चौधरीबरोबर याआधी एक दुर्दैवी घटना घडली होती. जुलै महिन्यात तो लोणावळ्याला जात असताना ट्रकने त्याच्या कारला धडक दिली होती. पण या अपघातात सुदैवाने आकाशला कोणतीही दुखापत झाली नव्हती.