पावसाळ्यात अनेक कलाकार शूटिंग आणि वैयक्तिक कामांमधून ब्रेक घेत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईबाहेर जातात. ‘बिग बॉस’ फेम अक्षय केळकर सुद्धा आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला गेला आहे. अलीकडेच अक्षयने त्याच्या पावसाळी ट्रेकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “उपाशी झोपलो, लोकांचे अपशब्द ऐकले अन्…”, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला संघर्षमय प्रवास

अक्षय केळकर दोन दिवसांपूर्वी आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर पावसाळी ट्रेकसाठी गेला होता. अभिनेत्याने या संपूर्ण सहलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षयच्या व्हिडीओवर त्याच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट करत त्याला ट्रेकच्या जागेबद्दल माहिती विचारली आहे. तर, काही नेटकऱ्यांनी अक्षय केळकर सांधण व्हॅलीला गेला असावा असा अंदाज कमेंटमध्ये वर्तवला आहे.

हेही वाचा : दोन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री एकत्र गेल्या पावसाळी ट्रेकला; नेटकरी म्हणाले, “तुम्ही मैत्रिणी कधी झालात?”

निसर्गरम्य वातावरणात अभिनेता आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर पावसाळी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान, त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री समृद्धी केळकरची झलक पाहायला मिळत आहे. एका युजरने या व्हिडीओवर, “तुमच्या दोघांच्या स्टोरीज खूप मस्त असतात” अशी कमेंट केली आहे. अक्षयने याला “माझी माणसं…” असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : ‘जवान’च्या ट्रेलरला अवघ्या २४ तासांत मिळाले ‘इतके’ व्ह्यूज; नेटकरी म्हणाले, “आता सोशल मीडिया प्रमोशनशिवाय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समृद्धी आणि अक्षयने यापूर्वी एकत्र ‘दोन कटिंग’ या सीरिजमध्ये काम केले होते. या सीरिजचे आतापर्यंत ३ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. समृद्धी केळकरने यापूर्वी छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’या मालिकांमध्ये काम केले आहे.