Bandgee Kallra House Robbery: टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ११’ मधून (Bigg Boss 11) आपली ओळख निर्माण करणाऱ्या बंदगी कालराच्या घरी चोरी झाली आहे. बंदगीने स्वतः सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. बंदगी कालराच्या मते, तिच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरीला गेली आहे आणि मौल्यवान वस्तू देखील गायब आहेत.

बंदगी कालराने पोस्टमध्ये फक्त तिच्या घरात झालेल्या दरोड्याची माहिती दिली नाही तर प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही टीका केली. बंदगी कालराची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

बंदगीच्या घराचे दोन्ही दरवाजे तुटलेले होते. तिच्या बहिणीचे लग्न होते, त्यामुळे त्यांच्या घरी रोख रक्कम होती, ती सगळी चोरीला गेली आहे. बंदगी कालरा म्हणाली, “काल रात्री घरी आलो आणि पाहिलं की माझ्या घरातील वस्तूंची तोडफोड झाली आहे. तसेच घरात चोरी झाली आहे. खूप वैयक्तिक वस्तू, पैसे चोरीला गेले आहेत. माझ्या बहिणीचे लग्न होते, त्यामुळे मी घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवली होती. माझ्या घरातील कॅमेराही एसडीसह चोरीला गेला आहे. दोन दरवाजे तुटलेले आहेत आणि कोणालाही काहीच समजलं नाही. यंत्रणा इतकी कमकुवत आहे की कोणतीही कारवाई करण्याऐवजी ते निवांत आहेत. घडलेल्या घटनेसंदर्भात कारवाई करण्याऐवजी ते डिनर करत आहेत. मी सामान्य स्थितीत येताच यासंदर्भात व्हिडीओ बनवेन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bandgee Kallra House Robbery
अभिनेत्री बंदगी कालराने केलेल्या पोस्ट (फोटो- स्क्रीनशॉट)

बंदगी कालराने इन्स्टाग्रामवर आणखी एक स्टोरी पोस्ट केली. त्यात तिला फार निराश वाटतंय, असं तिने म्हटलं आहे. “मला कधीच इतकं हतबल वाटलं नाही. ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू आहेत ते पाहून वाटतंय की काहीच घडत नाहीये. मला त्यांच्या कामावर आणि विश्वासार्हतेवर शंका येऊ लागली आहे. आतापर्यंत या प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही, त्यामुळे हे प्रकरण लवकरच दाबले जाईल असं दिसतंय. मी आपल्या व्यवस्थेवर खूप निराश आहे. मला याबद्दल माहीत होतंच पण आता मी हे अनुभवत आहे. मी चोरीची तक्रार केली त्याला ३० तासांहून जास्त वेळ झाला आहे,” असं बंदगीने म्हटलंय.