हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डेचा अखेर विवाह पार पडला. बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपबरोबर श्रीजिता लग्नबंधनात अडकली. जर्मनीत अभिनेत्रीचं ख्रिश्चन पद्धतीत लग्न झालं. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री श्रीजितानं स्वतः या लग्नसोहळ्याचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये दिसतं आहे. तर तिचा पती मायकल हा ब्लॅक सूटमध्ये पाहायला मिळत आहे. श्रीजितानं हे लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “आज आम्ही एकमेकांचा हातात हात घेऊन आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात जल्लोष करत आहोत.”

हेही वाचा – जॅकलिन फर्नांडिस होणार कपूर कुटुंबीयांची शेजारी; वांद्र्यामध्ये घेतलं आलिशान घर, किंमत ऐकून व्हाल हैराण

सध्या श्रीजिता आणि मायकलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे, देवोलीना, अर्चना गौतम, मोनालिसा अशा बऱ्याच कलाकांनी श्रीजिताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं, ऑगस्टऐवजी ‘या’ महिन्यात होणार रिलीज

आता श्रीजिता बंगाली चालीरितीनुसार पुन्हा एकदा मायकलबरोबर लग्न करणार आहे. हे लग्न गोव्यात होणार आहे. अभिनेत्रीनं १७ जुलैला मुंबईत मित्रांसाठी ग्रँड रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. काही दिवसांपूर्वी श्रीजितानं हनिमूनच्या प्लॅनबाबत माध्यमांना सांगितलं होता. श्रीजिताना म्हणाली होती, “आम्ही हनिमूनसाठी मालदीव जाऊ शकतो. पण बंगाली पद्धतीत लग्न झाल्यानंतर मला पुन्हा काम परतण्याची इच्छा आहे.”

हेही वाचा – सोनू सूदनं रिया चक्रवर्तीसाठी बनवला डोसा, व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले; म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचा खून….”

दरम्यान, श्रीजिता आणि मायकल २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहे. रेस्टॉरंटमध्ये झालेली भेट ही प्रेमात बदलली आणि आता लग्नही झालं. २०२१ मध्ये मायकलनं श्रीजिताला पॅरिसमध्ये प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघांचा लगेचचं लग्न करण्याचा विचार होता. पण लॉकडाऊन असल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर आज श्रीजिता आणि मायकल लग्नबंधनात अडकले.