scorecardresearch

Video : उकळतं पाणी अंगावर फेकल्यानंतरही अर्चना गौतमने विकासचा बाप काढला, कुत्र्याशी केली तुलना, भांडणात अंगावर धावून गेले अन्…

‘बिग बॉस १६’च्या घरात अर्चना व विकासमध्ये तुफान राडे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : उकळतं पाणी अंगावर फेकल्यानंतरही अर्चना गौतमने विकासचा बाप काढला, कुत्र्याशी केली तुलना, भांडणात अंगावर धावून गेले अन्…
'बिग बॉस १६'च्या घरात अर्चना व विकासमध्ये तुफान राडे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस १६’ या शोमधील सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अर्चना गौतम. घरातील इतर सदस्यांशी अर्चनाचा असलेला वाद-भांडण कायमच चर्चेत राहिलं. आताही अर्चनाने विकास मानकतबरोबर भांडण केलं आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : आधी ढकलून दिलं, उकळतं पाणी अंगावर ओतलं अन्…; ‘बिग बॉस १६’मध्ये अर्चना गौतमने ओलांडल्या सर्व मर्यादा, व्हिडीओ व्हायरल

अर्चनाने भांडणादरम्यान चक्क विकासच्या अंगावर उकळतं पाणी फेकलं. राग अनावर होताच तिने केलेलं हे कृत्य पाहून प्रेक्षकांनाही राग अनावर झाला. दरम्यान अर्चना व विकासचा हा वाद संपायचं काही नाव घेत नाही. या दोघांचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

‘कलर्स टीव्ही’ वाहिनीने ‘बिग बॉस १६’चा नवा प्रोमो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही भांडणामध्ये एकमेकांच्या अंगावर येताना दिसत आहेत. “कुत्र्यासारखं भुंकू नकोस चल चल” असं अर्चना विकासला म्हणते. यावर विकास म्हणतो, “तुझ्या बापाला जाऊन असं बोल.” यावर अर्चनाचा राग अनावर होतो. “बापावर जाऊ नकोस. तू स्वतः बाप बनू शकत नाहीस.”

आणखी वाचा – Video : रुग्णालयामध्ये तुनिषा शर्माचा मृतदेह पाहून आईची झाली अशी अवस्था, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळले

दरम्यान “तुझ्यासारख्या लोकांना मी अशीच मारते.” असंही अर्चना म्हणते. यादरम्यान अर्चनाचा व गौतमचा स्वतःवरील ताबा सुटतो. दोघंही एकमेकांच्या अंगावर धावून जातात. हा नवा व्हिडीओ पाहून नेटकरी अर्चनालाच ट्रोल करत आहेत. तसेच अर्चना घरातील सदस्यांना अधिक त्रास देते असंही प्रेक्षक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 13:48 IST

संबंधित बातम्या