सध्या ‘बिग बॉस हिंदी’चे १६ वे पर्व सुरु आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक पर्वामध्ये एक तरी लव्हस्टोरी पाहायला मिळते. यातील काही कपल्स बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यावर एकत्र राहतात, तर काही जोड्या बाहेर गेल्या-गेल्या तुटतात. या सोळाव्या पर्वामधल्या स्पर्धकांमध्येही लव्ह अँगल आल्याचे पाहायला मिळत आहे. या पर्वातील स्पर्धक सौंदर्या शर्मा आणि गौतम विग यांच्यामध्ये काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये निमृत, गौतम, शालीन आणि टीना यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. गौतम आणि निमृत यांनी मिळून सुंबुलला शालीन आणि टीना यांच्या प्लॅन्सबद्दलची माहिती दिली. यामुळे पुढे गौतम-शालीनमध्ये भांडण झाले. याच सुमारास प्रियांकाने एमसी स्टॅनने बाथरुम व बेसिन साफ न केल्यामुळे ओरडते. त्यावर स्टॅन लगेच भडकतो. शिव त्याला शांत करत त्याला बाजूला घेऊन जातो आणि त्याला शांत राहून खेळ खेळायचा सल्ला देतो.

आणखी वाचा – डायमंड ज्वेलरी ते मिठाई, ‘कॉफी विथ करण’च्या लाखो रुपयांच्या गिफ्ट हॅम्परमध्ये नक्की असतं? घ्या जाणून

रात्री सगळे झोपल्यानंतर सौंदर्या आणि गौतम एकाच बेडवर एकत्र चादर उढून गप्पा मारताना दिसतात. तेव्हा गौतम तिला ‘तू ना माझ्याशी रात्री भांडत जाऊ नकोस’, असे म्हणतो. त्यावर लगेच सौंदर्या लाडात म्हणते, ‘आज तर मी तुला काही केलं नाही ना…’ नंतर तो सौंदर्याला ‘गुड गर्ल’ म्हणत तिच्या रात्रीच्या अंधारामध्ये गप्पा हळू आवाजामध्ये गप्पा मारायला लागतो. पुढे लडिवाळपणे ती गौतमला ‘मला तुला त्रास द्यायला फार मजा येते”, असं म्हणते.

आणखी वाचा – Bigg Boss 16: …अन् शिव ठाकरेमुळे निमृत ढसाढसा रडू लागली; दोघांमधील कडक्याच्या भांडणाचं कारण काय? पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व प्रकारानंतर ते दोघे जवळ आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यामध्ये गौतम आणि सौंदर्या ही जोडी बिग बॉस १६ मध्ये रोमान्स करताना दिसू शकते.