‘बिग बॉस १६’ हे नवं पर्व जेव्हापासून सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर या शोला चांगलाच विरोध होत आहे. यामागे एकमेव कारण म्हणजे दिग्दर्शक साजिद खान यांची या शोमध्ये एंट्री. काही वर्षांपूर्वी ‘मी टू’ प्रकरणात अडकलेल्या साजिद खानला बिग बॉसच्या मंचावर पाहून लोकांचा राग अनावर झाला. कित्येकांनी साजिदवर आरोप केले तर इंडस्ट्रीतील काही लोक त्याच्या बाजूने उभे राहिले, अशातच या वादात नुकतीच आणखी भर पडली आहे.

नुकतंच बिग बॉस १६ चे स्पर्धक साजिद खान आणि गोरी नागोरी यांच्यात वाद झाला असून या प्रकरणात साजिद खानची वर्तणूक चांगली नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. कालपर्यंत गोरी एमसी स्टेन, खान आणि शिव ठाकरे यांच्यासोबत तिची रूम शेअर करत होती. बिग बॉसच्या नियमानुसार प्रत्येक रूमसाठी अन्न धान्य वाटप करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी, गोरी इतर सदस्यांना न विचारता तिच्या खोलीतील अन्नपदार्थ सौंदर्या शर्मासोबत शेअर करताना पकडली गेली होती. यामुळेच साजिद खान तिच्यावर प्रचंड चिडला असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : आमच्या आगामी चित्रपटाचे नाव ओळखा पाहू; अभिनेत्री पल्लवी जोशीची ‘ही’ पोस्ट चर्चेत

दिवसागणिक साजिद आणि गोरी यांच्यातील हे वैमनस्य वाढत असून इंटरनेटवर याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. या वादाचे बरेच व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पाहून साजिद खानची महिलांप्रती वर्तणूक चांगली नसल्याचं कित्येक नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे. यामुळे साजिदला पुन्हा घराबाहेर काढा अशी मागणीदेखील होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी शिव ठाकरे आणि गोरी नागोरी यांच्यात घरातील कामावरून जोरदार वाद झाला. साजिद, शिव, अब्दु रोजिक आणि एमसी स्टेन यांनी गोरीला त्यांच्या ग्रुपमधून बाहेर काढून टाकल्यामुळे बिग बॉसच्या घरात सध्या हे वाद आपल्याला बघायला मिळत आहे. साजिद खान यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे आणि पुन्हा त्याच्यावर सोशल मीडियावर सडकून टीका होताना दिसत आहे.