अवघ्या २३व्या वर्षी रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस १६’ शोचं विजेतेपद पटकावलं. एमसी आता देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. तो आज लाखो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. शिवाय एमसी त्याच्या गाण्यांमधून मिळवत असलेले पैसे लाखोंच्या घरात आहे. फक्त तीन ते चार वर्षांमध्ये त्याने स्वतःच्या मेहनतीवर प्रसिद्धी व श्रीमंती अनुभवली. त्याचे महागडे दागिने, बूट याची बरीच चर्चा रंगताना दिसते.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट, एका तिकिटाची किंमत आहे तब्बल…

guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Sainik School Satara Bharti 2024
Sainik School Satara Bharti : सैनिक स्कूल सातारामध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळेल ३८ हजार रुपयांपर्यंत पगार
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश

एका दिवसाला किती रुपये खर्च करतो एमसी स्टॅन?

‘तडीपार’, ‘इंसान’ हे त्याचे दोन अल्बम एकापाठोपाठ एक सुपरहिट ठरले. या गाण्यांमुळेच त्याला खरी ओळख मिळाली. महागड्या वस्तूंचा वापर करणं एमसीला आवडतं. त्याच्या स्टाइलमधून ते दिसून येतं. एका मुलाखतीदरम्यान एमसीने दरदिवशी तो परिधान करत असलेले कपडे, बूट व दागिन्यांची किंमत किती असते याबाबत भाष्य केलं.

या मुलाखतीमध्ये “बूटांपासून ते केसांपर्यंत नेहमी तू किती खर्च करतो?” असा प्रश्न एमसीला विचारण्यात आला. यावर त्याने उत्तर दिलं की, “नेहमी मी १ लाख २० हजार स्वतःवर खर्च करतो”. यानंतर एमसीने त्याने परिधान केलेलं टीशर्ट ४५ हजार रुपयांचं आहे असं सांगितलं. तर त्याने या मुलाखतीमध्ये दिड कोटी रुपयांचे दागिने परिधान केले होते.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

“मरण येण्यापूर्वी मला सगळं काही करायचं आहे”. असंही एमसीने या मुलाखतीमध्ये सांगितलं. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये एमसीकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. बऱ्याचदा रस्त्यावरही झोपायला लागायचं असं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आता त्याने कलाक्षेत्रामध्ये त्याचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.