‘बिग बॉस १६’ चा विजेता व तरुणाईत लोकप्रिय असलेला पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. एमसी स्टॅन रॅप सोडणार असल्याची चर्चा त्याच्या या पोस्टनंतर होऊ लागली आहे. स्टॅनने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सूचक वाक्य लिहिलं आहे, ज्यात रॅप सोडण्याचा उल्लेख आहे.

एमसी स्टॅनच्या पोस्टनंतर त्याचे चाहते चिंतेत आहेत. कदाचित तो रॅप करणं सोडू शकतो, असं म्हटलं जात आहे. पण त्याने याबाबत स्पष्ट काहीही सांगितलेलं नाही. स्टॅनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रॅपिंग सोडण्याबद्दल एक पोस्ट केली. त्यामुळे तो नजिकच्या काळात खरंच रॅपिंग सोडणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Video: आमदार धिरज देशमुखांच्या सासूबाईंना पाहिलंत का? रकुल व जॅकीबरोबरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

एमसी स्टॅनने पोस्टमध्ये तो रॅपिंग सोडणार असल्याचं म्हटलं आहे. “मी रॅपिंग सोडणार आहे,” असं त्याने लिहिलं आणि त्याचबरोबर रेड हार्ट इमोजी पोस्ट केला होता. स्टॅनने ही घोषणा केली आहे की तो येत्या काळात रॅप सोडणार असल्याचा विचार करतोय, याबाबत स्पष्टता नाही. पण त्याने पोस्ट केलेल्या या स्टोरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने ही पोस्ट नंतर डिलीट केली.

mc stan
एमसी स्टॅनची पोस्ट

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टॅनने अलीझेह अग्निहोत्री स्टारर ‘फर्रे’ चित्रपटातील गाण्याने गायक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्याने रॅप सोडण्याबद्दल ही पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ८ मार्च २०२४ रोजी त्याचा ‘नम्ब’ नावाचा नवीन म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता एमसी स्टॅन खरंच रॅप सोडणार की हा फक्त पब्लिसिटी स्ंटट आहे ते लवकरच कळेल.