रॅपर एमसी स्टॅन ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरला. पुण्याच्या एमसी स्टॅनने सर्वाधिक मत मिळवत ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर स्टॅनच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. याची प्रचिती त्याने केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमधून दिसून आली.

बिग बॉसच्या विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनने गुरुवारी(१६ फेब्रुवारी) पहिल्यांदाच चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम लाइव्ह केलं होतं. एमसी स्टॅनने चाहत्यांसाठी केवळ १० मिनिटे लाइव्ह केलं होतं. या लाइव्हमध्ये त्याने त्याचं गाणं गायलं. १० मिनिटांसाठी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये स्टॅनला तब्बल ५ लाख ४१ हजार चाहते पाहत होते. इन्स्टा लाइव्हला इतके जास्त व्ह्यूज मिळणारा स्टॅन पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. शाहरुख खानचा विक्रम मोडून स्टॅनने नवा विक्रम रचला आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाइव्हला २ लाख ५५ हजार व्ह्यूज मिळाले होते.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनला लॉटरी; अ‍ॅमेझॉनसह मिळाल्या २० ब्रँडच्या ऑफर

हेही वाचा>> Video: “पिक्चर अभी बाकी है” कोर्ट मॅरेज, साखरपुड्यानंतर आता स्वरा भास्करची लगीनघाई, म्हणाली…

एमसी स्टॅनच्या लाइव्हचा जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप १० लाइव्हमध्ये समावेश झाला आहे. या इन्स्टा लाइव्हचा स्टॅनलाही प्रचंड फायदा झाला आहे. रॅपर एमसी स्टॅन पूर्वी एका इन्स्टाग्राम स्टोरीसाठी ५-७ लाख रुपये मानधन घ्यायचा. आता त्याला इन्स्टा स्टोरीसाठी ८-१० लाख रुपये मिळतात. तर एका रीलसाठी स्टॅनला १८-२३ लाख रुपये मिळायचे.बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर स्टॅनच्या रीलसाठीच्या मानधनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा>> आंदोलनातील पहिली भेट अन्…; समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदच्या प्रेमात स्वरा भास्कर कशी पडली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’चं विजेतेपद मिळवल्यानंतर एमसी स्टॅनचं नशीब उजळलं आहे. स्टॅनला अॅमेझॉन मिनी टीव्हीची ऑफर मिळाली आहे. या अॅमेझॉनसह स्टॅनने करारही केला आहे. याशिवाय इतर २० ब्रँडच्या ऑफरही स्टॅनला मिळाल्या असल्याची माहिती आहे. एमसी स्टॅनचे मॅनेजर अपूर्व भटनागर यांनी ही माहिती दिली आहे.