छोट्या पडद्यावरील रियालिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक स्पर्धेकाने खेळीवर आपला वेगळा चाहता वर्ग बनवला आहे. या शोमधील अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैनची जोडी जास्त चर्चेत आहे. दोघांमध्ये उडणाऱ्या खटक्यांमुळे सगळ्यांच लक्ष वेधलं जाता. मात्र, आता विकी आणि अंकिताच्या वादानंतर दोघांच्या आईमध्येही खटके उडाल्याचं बघायला मिळालं आहे.

हेही वाचा- Bigg Boss 17: नॉमिनेशन टास्कदरम्यान अंकिता लोखंडे आणि निल भट्टमध्ये कडाक्याचं भांडण, पाहा नवा प्रोमो

गेल्या आठवड्यात विकेंड का वॉरमध्ये या शोमधील अंकिता लोखंडे व विकी जैन या दोघांच्या आईंनी ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली होती. आईला बघून अंकिता आणि विकी भावूक झाले होते. विकी इतका भावूक झाला की आईला बघून ढसाढसा रडायला लागला. विकीला रडताना बघून त्याची आई त्याची समजूत काढताना दिसली. त्यानंतर अंकिताची आई बोलण्याचा प्रयत्न करते मात्र, विकीची आई तिला बोलू देत नाही.

विकीची आई म्हणते, “टाळी एका हाताने कधीच वाजवता येत नाही. जे घडले ते विसरून जा, पती पत्नीच्या नात्यात अशी भांडण होतात, असे उतार चढाव येतात, आता गोष्टी सुधारण्याची वेळ आली आहे. तुमच्या नात्यावर काम करा. एकत्र वेळ घालवा. भांडणे टाळा. बाहेर तुम्ही दोघे खूप प्रेमाने राहत होता आणि घरात, अंकिता विकीवर चप्पल फेकत आहे आणि त्याला लाथ मारत आहे.” विकीच्या आईचं बोलून झाल्यावर ‘बिग बॉस’ अंकिताच्या आईला प्रश्न विचारतात.

हेही वाचा- Bigg Boss 17: बॉलीवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ओरी बिग बॉसच्या घरातून एका दिवसातच बाहेर, कारण…

बिग बॉसच्या प्रश्नावर अंकिताची आई उत्तर देत असतानाच विकीची आई मध्येच बोलू लागते त्यामुळे बिग बॉस विकीच्या आईला अडवतात आणि म्हणतात, ‘विकीच्या आई, अंकिताच्या आईला प्रश्न विचारला आहे, त्यांना बोलू द्या.’ यानंतर अंकिताची आई म्हणते, ‘विकीसारखा माणूस शोमध्ये रडू शकतो, यावरुन मी समजू शकते की आतमध्ये किती दडपण आहे.’ त्यानंतर काही वेळाने अंकिता आणि विकीची आई जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत असतात तेव्हा अंकिताची आई विकीच्या आईकडे नारजी व्यक्त करत म्हणते. तुम्ही अशा पद्धतीने बोलत होतात मला बोलू दिलंच नाहीत. दोघांमधील हे बोलणं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे.