‘बिग बॉस’चं १७वं पर्व शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. काही आठवड्यांवर ‘बिग बॉस १७’ची महाअंतिम फेरी येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या बिग बॉसमध्ये जोरदार टास्क पाहायला मिळत आहे. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या रणनीतीने खेळता दिसत आहे. त्यामुळे बिग बॉसमधील सदस्यांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.

या आठवड्याच्या मीड वीक इविक्शनमध्ये समर्थ जुरेल म्हणजेच चिंटू घराबाहेर झाला. आता शोमध्ये या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये दोन टीम असून या दोन्ही टीममधील सदस्य टॉर्चर करताना दिसणार आहे. याचा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: अंकिता लोखंडेच्या समर्थनात उतरली सुशांत सिंह राजपूतची बहीण, म्हणाली, “अंकी तू…”

‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडिया अकाउंटवरून नॉमिनेशन स्पेशल टास्कचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन टीम पाहायला मिळत आहे. ‘ए टीम’मध्ये मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण आहे. तर ‘बी टीम’मध्ये अंकिता, विक्की, आयशा आणि इशा आहे. या दोन टीममध्ये नॉमिनेशन टास्क होताना दिसत आहे. यावेळी अंकिता अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स करताना दिसत आहे. तर आयशा मन्नाराच्या चेहऱ्यावर लाल मिरची पावडर फेकताना पाहायला मिळत आहे. ‘बी टीम’कडून जबरदस्त टॉर्चर केलं जात असलं तरी मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण दिलेल्या जागेवर तग धरून उभे आहेत.

हेही वाचा – अंगात ताप असूनही ‘ठरलं तर मग’मधील अभिनेत्री करतेय काम, इन्स्टा स्टोरी शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता हा नॉमिनेशन टास्क कोणती टीम जिंकते? या आठवड्यासाठी कोण-कोण नॉमिनेट होतं आणि कोण घराबाहेर जात हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.