लोकप्रिय अभिनेत्री अंकिता सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉस १७ मध्ये ‘अंकिता तिचा पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. मात्र बिग बॉसच्या घरात अंकिता आणि तिच्या पतीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट केली होती. आता या टेस्टचे रिपोर्ट समोर आले आहेत.
बिग बॉसमधील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या खेळीवर वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट केली होती. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एवढंच नाही तर तिला आंबट खावसं वाटतंय असंही ती म्हणाली होती. अभिनेत्रीच्या या विधानानंतर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. आता अंकिताच्या प्रेग्नन्सी टेस्टचे रिपोर्ट समोर आले आहेत. रिपोर्टनुसार अंकिता गरोदर नसल्याचे सिद्ग झालं आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये अंकिता तिचा पती विकी जैनसोबत तिच्या मूड स्विंगबद्दल बोलताना दिसली होती. अंकिता म्हणाली होती, “मला वाटतं की मी आजारी आहे, मला आतून जाणवत आहे की माझी तब्येत बरी नाही. मला मासिक पाळी येत नाहीये. मला घरी जायचे आहे; एवढंच नाही तर अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेग्नन्सी टेस्टही केली होती.
हेही वाचा- Video पती विकीला चप्पल फेकून मारली म्हणून अंकिता लोखंडेवर भडकली सासू , म्हणाली “तू …”
बिग बॉसच्या या आठवड्याच्या वीकेण्ड का वार’मध्ये अंकिता व विकीची आई आली होती. बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकीमध्ये होणाऱ्या वादावर विकीच्या आईने भाष्य केलं आहे. एवढंच नाही, अंकिताने विकीला चप्पल फेकून मारल्याच्या प्रकारावरही त्या संतापलेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या, “तुम्ही घरी असताना एकमेकांशी इतके छान वागत होतात, मात्र इथे येऊन तू विकीला चपलेने मारत आहेस.” यावर अंकिता म्हणाली, “मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन.” यावर विकीची आई पुन्हा चिडून, “नाही, तू काही सांभाळत नाही आहेस”, असं म्हणताना दिसत आहे.