‘बिग बॉस’ टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सलमान खानचे सुत्रसंचालन पाहायला अनेक चाहते उत्सुक असतात. आत्तापर्यंत ‘बिग बॉस’चे १६ पर्व येऊन गेले आहेत. बिग बॉसचे प्रत्येक पर्व खूपच गाजले. आता प्रेक्षक ‘बिग बॉस’च्या पुढच्या म्हणजे १७ व्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच ‘बिग बॉस’चे १७ पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- Video: रामायण पुन्हा एकदा उलगडलं जाणार, ‘श्रीमद् रामायण’ या बिग बजेट मालिकेचा पहिला प्रोमो समोर
नुकतचं ‘बिग बॉस’ ओटीटी सीझन २ पार पडले. यूट्यूबर एल्विश यादव यंदाच्या ‘बिग बॉस’ ओटीटी सीझन २ चा विजेता बनला. मिळालेल्या माहितीनुसार आता निर्माते लवकरच कलर्स चॅनेलवर ‘बिग बॉस’ १७ घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. १५ सप्टेंबरच्या सुमारास हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रसारीत होऊ शकतो. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बिग बॉसचे १६ वे पर्वही खूप गाजले होते. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. ‘बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. या पाच जणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. अखेर रॅपर एमसी स्टॅन १६ व्या पर्वाचा विजेता ठरला होता.
‘बिग बॉस १७’ मध्ये कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. रिपोर्ट्सनुसार, या रिअॅलिटी शोच्या सीझन १७ साठी दोन नावे लॉक करण्यात आली आहेत. निश्चित झालेल्या स्पर्धेत, ‘खतरों के खिलाडी १३’ ची अंतिम फेरीतील ऐश्वर्या शर्मा आणि UK07 रायडर उर्फ अनुराग डोवाल यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय बिग बॉस १७ मध्ये टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध कलाकारही देखील दिसू शकतात. यामध्ये दिव्यांका त्रिपाठी, मनीषा राणी, जेनिफर विंगेट यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.