Bigg Boss 19 Fame Amaal Malik Share Mother Story : सलमान खानचा लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. काही आठवड्यांपूर्वी या शोचा १९ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अनेक सलिब्रिटी सहभागी झाले आहेत. ‘बिग बॉस’ या शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शोप्रमाणे सहोमधील स्पर्धकही कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत येत असतात.
अशातच शोमध्ये सहभागी झालेला स्पर्धक आणि लोकप्रिय गायक-संगीतकार अमाल मलिक चर्चेत आला आहे. अमाल मलिकचं कौटुंबिक नातं आणि त्याचे जीवनातील अनेक संघर्ष नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. अशातच त्याने नुकतंच त्याच्या आईच्या संघर्षमय आयुष्याबद्दल भावनिक खुलासा केला.
नुकत्याच झालेल्या भागात अमालने बसीर अलीबरोबर साधलेल्या संवादात आईच्या गरोदरपणात तिने भोगलेल्या यातनांबद्दल सांगितलं. आईय गरोदर असताना तिला खूप संकटातून जावं लागलं असल्याचं अमालने सांगितलं.
याबद्दल अमाल म्हणाला, “जेव्हा माझी आई माझ्या गरोदर होती, तेव्हा तिला खूप काही ऐकावं लागलं. आम्ही एकत्र कुटुंबात राहत होती आणि तिच्यावर खूप कामाचा भार टाकला जायचा. एक दिवस ती एवढी रागावली की, तिने संतापाच्या भरात आपला हात कपाटावर आपटला. तिने हे सगळं सहन केलं, तिने त्यावेळी सोसलेली प्रत्येक वेदना हीच कारण आहे की, आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत.”
यासह अमालने त्याचे काका अनू मलिक यांच्यावर वडिलांना कायम डावलला गेल्याचं सांगितलं. वडिलांना खोटं खोटं गायला बोलवून, ते गाणं खरंतर दुसऱ्या गायकाकडून गाऊन घेतलं, हे सांगितलं. तसंच यांमुळे वडिलांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
याशिवाय अमालने लहान असतानाच एक प्रसंगही सांगितला, जेव्हा काका अनू मलिक यांनी त्याच्याबरोबर वाईट वर्तणूक केली होती. या प्रसंगाबद्दल अमाल म्हणाला, “त्यादिवशी जुहू परिसरात खूप पाऊस झाला होता, सगळीकडे पाणी साचलेलं होतं. मी फक्त सात वर्षांचा होतो आणि पावसाचं पाणी माझ्या छातीपर्यंत आलं होतं. मी गेटबाहेर अडकलेलो, रडत होतो. समोरच माझ्या काकांची गाडी उभी होती. मी त्यांना पाहिलं. माझी काकू, ड्रायव्हर आणि बाकीचं कुटुंब गाडीत बसलेलं होतं. त्यांनी मला पाहिलं… आणि गाडीचं दरवाजा बंद केला. ते मला तसंच सोडून निघून गेले.”
अमाल मलिक इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर अमालने सांगितलं, “तेव्हा रस्त्यावर मॅनहोल उघडे होते, जीवाला धोका होता. मग वडिलांच्या एका मित्राच्या पत्नीने मला पाहिलं. त्यांनी त्यांच्या गाडीत बसवलं आणि घरी सोडलं. मी मदतीसाठी ओरडत होतो. पण त्यांनी माझ्या डोळ्यासमोर दरवाजा बंद केला गेला. जेव्हा मी घरी गेलो आणि सगळं सांगितलं, तेव्हा घरात भांडणं झाली होती.”
