Bigg Boss 19 Eviction Updates : सलमान खानचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ हा नुकताच रविवारी (२४ ऑगस्ट) सुरू झाला. शो सुरू होताच अगदी पहिल्याच दिवशी घरातील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. वाद, चर्चा व ड्रामामुळे शोला सुरुवातीपासूनच जोरदार रंग चढलेला दिसतोय.

त्यातच आता शो सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात मिड-वीक एविक्शन पार पडलं. होय… ‘बिग बॉस १९’ सुरू होताच पहिल्या आठवड्यातच घरातील पहिला स्पर्धक बाहेर पडला आहे; पण त्यात एक ट्विस्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातून पहिल्यांदा फरहाना भट्ट हिला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

फरहाना ही पहिल्याच आठवड्यात घरातील ‘व्हीलन’ म्हणून ओळखली जाऊ लागली होती. पण… ही गोष्ट एवढ्यावरच संपत नाही! कारण- फरहानाला केवळ घरातून बेघर करण्यात आलंय. शोमधून पूर्णपणे बाहेर काढण्यात आलेलं नाहीये. फरहानाला ‘सीक्रेट रूम’मध्ये पाठवण्यात आलं आहे.

सीक्रेट रूममध्ये काय घडतं?

सीक्रेट रूममध्ये बसून फरहाना आता घरातील इतर सदस्यांची प्रत्येक हालचाल, प्लॅनिंग व स्ट्रॅटेजी बारकाईने पाहू शकते. याचा तिला तिच्या पुढच्या गेममध्ये मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे घरातील इतर स्पर्धकांसमोर मोठं आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे ती ‘सीक्रेट रूम’मधून बाहेर येताच आणखी ट्विस्ट येणार, हे नक्की.

या ७ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

या आठवड्यात ७ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यात अभिषेक बजाज, गौरव खन्ना, झीशान कादरी, नीलम गिरी, तान्या मित्तल, नतालिया जानोस्झेक, प्रणीत मोरे या नावांचा समावेश आहे. शोच्या सुरुवातीलाच इतक्या स्पर्धकांची नॉमिनेशन लिस्ट तयार होणं हे खूप मोठं टेन्शन निर्माण करतंय.

आता पहिल्या ‘वीकेंड का वार’ या खास भागाकडे ‘बिग बॉस’प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात ‘बिग बॉस १९’च्या घरातून वर उल्लेख केलेल्या सात जणांपैकी कोणाचा पत्ता कट होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.