Bigg Boss 19 Updates :‘बिग बॉस १९’मध्ये गौरव खन्ना हा एकटाच असा स्पर्धक आहे, जो प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट होतो. त्याचबरोबर तो कॅप्टन्सीचा दावेदारदेखील बनत आहे. मात्र, त्याला अजून कॅप्टन बनता आलेले नाही. मागील टास्कमध्ये तो कॅप्टन बनला, पण काही तासांतच सत्ता पलटली आणि त्याची इम्युनिटी काढून घेतली गेली आणि दुसऱ्या कोणीतरी त्याची जागा घेतली. अशातच आता नव्या टास्कमध्ये तो कॅप्टन झाला आहे.

‘बिग बॉस’ने कॅप्टन्सी आणि राशन टास्कसाठी घरातल्या प्रत्येक सदस्याला दोन पर्याय दिले. यापैकी पहिला पर्याय असा आहे की, आपले सोशल मीडिया फॉलोवर्स जाणून घ्या आणि १०% राशनचा त्याग करा” आणि दुसरा पर्याय असा की, “फॉलोवर्स जाणून न घेता १०% राशन वाढवून घ्या. यात गौरव खन्नाने कॅप्टन्सीचा पर्याय निवडला, पण या निर्णयामुळे संपूर्ण घर नॉमिनेट झाले.

गौरव खन्ना कॅप्टन बनला; पण घरात निर्माण झाले वाद

अशनूर आणि प्रणित यांनी फॉलोवर्स जाणून घेतले नाहीत, त्याऐवजी त्यांनी राशनचा निर्णय घेतला. पण मालती, कुनिका, अमाल आणि तान्या यांनी सोशल मीडिया फॉलोअर्स जाणून घेण्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे घरात ६०%च राशन उरलं. नंतर गौरवकडे दोन पर्याय होते. पहिला – तो कॅप्टन बनून संपूर्ण घराला नॉमिनेट करेल आणि ३०% राशन घेईल. दुसरा पर्याय असा की, तो शहबाजला कॅप्टन बनवून १००% राशन घेईल आणि कोणालाही नॉमिनेट केले जाणार नाही. गौरवने पहिला पर्याय निवडला, ज्यामुळे घरात मोठा वाद निर्माण झाला.

गौरव खन्ना कॅप्टन बनला, पण त्याच्यावर झाले आरोप

गौरव खन्ना कॅप्टन बनल्यानंतर घरातले सर्व सदस्य नॉमिनेट झाले आणि त्यांना ३०% राशन मिळालं. याबद्दल फरहाना, शहबाज, कुनिका आणि मालती यांनी गौरववर टीका केली. तसंच त्यांनी ‘बिग बॉस’वरही पक्षपाती असल्याचा आरोप केला. गौरवला कॅप्टन बनवण्यासाठीच बिग बॉसनं ही खेळी खेळल्याची टीका त्यांनी केली. अमाल, फरहाना आणि कुनिका यांचे म्हणणे होते की, “बिग बॉसने गौरवला चतुराईने कॅप्टन बनवले.”

अमाल, फरहाना आणि कुनिका यांच्या आरोपांवर ‘बिग बॉस’ नाराज झाले आणि सर्व सदस्यांना असेम्बली रूममध्ये बोलावून घेतलं. यानंतर पुन्हा कॅप्टन्सी टास्क घेण्यात आला आणि सर्वांना पेपर आणि पेन दिले. या टास्कमध्ये गौरव आणि शहबाज यांमध्ये एकाला कॅप्टन बनवण्यास सांगितलं. यात गौरवला फक्त प्रणित आणि अशनूरचे समर्थन होतं, तर शहबाजला फरहाना, अमाल, तान्या आणि कुनिका यांचे समर्थन मिळालं, त्यामुळे शहबाज नवीन कॅप्टन बनला.

शहबाज कॅप्टन बनल्यानंतरही घरातले राशन ३०%च राहिलं. त्याचसोबत, गौरवसह सर्व सदस्य नॉमिनेटेड राहिले. यावेळी नॉमिनेट केलेल्या सदस्यांमध्ये गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, मालती चाहर, प्रणित मोरे, कुनिका सदानंद आणि अशनूर कौर यांचा समावेश आहे; त्यामुळे आता यांपैकी कोण घराबाहेर जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.