‘रोडिज’मध्ये झळकलेला शिव ठाकरे मराठी बिग बॉसमुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर शिवनं हिंदी ‘बिग बॉस १६’मध्ये प्रवेश केला आणि तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता शिव ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये पाहायला मिळतं आहे. त्यानं इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे त्याला एका पाठोपाठ एक रिअ‍ॅलिटी शो मिळतं आहेत. असा हा लोकप्रिय मराठमोळा शिव त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच त्यानं लग्नाबाबत स्पष्ट मतं व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – बिग बॉस फेम अभिनेत्याने केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक, फोटो शेअर करत म्हणाला…

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात असताना शिव आणि वीणा या जोडीची चांगलीच चर्चा रंगली होती. या शोमध्ये असताना शिवनं एका टास्क दरम्यान वीणा नावाचा हातावर टॅटूही काढून घेतला होता. त्यानंतर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर वीणानेही शिवच्या नावाचा टॅटू हातावर काढला होता. काही काळासाठी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण कालांतराने शिव आणि वीणाचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आता शिवचं नाव पुन्हा एकदा बॉलीवूड अभिनेत्री डेजी शाहबरोबर जोडलं जात आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु, आता डेजीनं शिवला डेट करत नसल्याचं स्पष्टच सांगितलं आहे. अशातच आता शिवनं लग्नाबाबत भाष्य केलं आहे.

हेही वाचा – ‘रॉनी और रानी…’च्या रिमेकमध्ये ३५ वर्षांनी धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या जागी कोणाला घेशील? ‘ही’ नावं घेत करण जोहर म्हणाला…

‘रेडिओ सिटी मराठी’ या यूट्युब चॅनेलवर नुकतीच शिवनं मुलाखत दिली. यावेळी मुलाखतीच्या शेवटी त्याला विचारलं की, ‘लग्न कधी करतोयस?’ त्यावर शिव म्हणाला की, “खरंतर आता माझं करिअर सुरू झालंय. चेहऱ्यावरचं जे आता हसू आहे, उगाच नको ना जायला. चेहऱ्यावर नॅचरल हसू राहिलं पाहिजे”

हेही वाचा – ‘या’ फोटोमुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली व निमिषच्या अफेअरच्या चर्चांना आलं होतं उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर त्याला विचारलं की, ‘पण याबाबत तू आई-वडिलांना कसं टाळतोस?’ त्यावेळेस शिवनं एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “जेव्हा आई मला फोन करून सांगतं असते की, इथली दर्यापूरची मुलगी आहे. चांगली आहे. डॉक्टर आहे. १०० एकर जमीन आहे. मग मी लगेच म्हणतो, ठीक आहे. तू ती मुलगी ठरवं. मी मुंबईची ठरवतो, ताईला सांग तिच्याकडची मुलगी ठरवं. यानंतर आई म्हणते, काय फालतूपणा आहे. मोठा हो. मग ती फोन ठेवून देते.”