अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा १८ सप्टेंबरला थाटामाटात पार पडला. जवळच्या नातेवाईकांसह अनेक मराठी कलाकारांनी अमृता-प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली होती. जुलै महिन्यात दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत त्यांच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली होती. आता लग्नानंतर पहिल्यांदाच हे जोडपं लोकमत फिल्मीच्या एका कार्यक्रमात सहभागी झालं होतं. यावेळी दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं.

लग्नाआधी प्रसाद-अमृता एकत्र लिव्ह इनमध्ये राहत होते याबद्दल सांगतना अभिनेत्री म्हणाली, “लग्नाआधी चहा-पोह्यांचा कार्यक्रम पार पडण्यापूर्वी आम्ही दोघं एकत्र राहायला लागलो होतो. आमच्या घरच्यांनी तुम्ही लग्न करणार आहात ना? तुमच्या नात्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे ना? असं आधीच विचारलं होतं. खरंतर, मला वाटतं आपण एखाद्या व्यक्तीला आणखी ओळखून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतो.”

हेही वाचा : स्वप्ननगरीत फुलणार नवीन नातं! दादा खोतांना समजेल का लेकीचं सत्य? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका रंजक वळणावर…

प्रसाद यावर म्हणाला, “आमच्या घरच्यांना एका ठराविक वेळेनंतर आमच्या नात्यावर पूर्णपणे विश्वास बसला. लिव्ह इनबद्दल प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. पण, आम्हा दोघांसाठी ती गोष्ट खूप छान पद्धतीने वर्क झाली. लग्न झाल्यावर एकदम सगळ्या गोष्टी कळण्यापेक्षा आधीपासून एकत्र राहिल्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना समजून घेतोय. आता एकमेकांच्या सगळ्या सवयी आम्हाला माहिती आहेत.”

हेही वाचा : “भिडू वजन कमी कर…”, जॅकी श्रॉफबरोबरच्या फोटोला स्मृती इराणींनी दिलं मजेशीर कॅप्शन, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसाद-अमृता यांची जोडी ‘बिग बॉस मराठी’ या शोपासून चर्चेत आली होती. दोघांनीही या कार्यक्रमात एकत्र सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस’मधील आवडत्या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र आलेलं पाहून सध्या दोघांचेही चाहते आनंद व्यक्त करत आहेत. याशिवाय अमृताच्या कामाबद्दल सांगायंच झालं, तर सध्या ती ‘नियम व अटी लागू’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.