Bigg Boss Fame Dhananjay Powar Shared A Video Of Daughter : ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा तो त्याच्या अकाउंटवरून वेगवेगळे व्हिडीओ शेअर करतो. अशातच आता त्यानं त्याच्या बायको व लेकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
धनंजय अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबरोबरचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतो. अशातच आता त्यानं त्याच्या बायको व लेकीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याची बायको व लेक जान्हवी गणरायाचं लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहेत. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघी ‘अशी चिक मोत्याची माळ’ हे गाणं गाताना दिसत आहेत.
‘बिग बॉस’ फेम धनंजय पोवारच्या लेकीचं नेटकऱ्यांकडून कौतुक
व्हिडीओमध्ये कल्याणी आधी हे गाणं गाते आणि नंतर लेकीला गायला सांगते. त्यानंतर तिची लेकसुद्धा ‘अशी चिक मोत्याची माळ’ हे गाणं गाते. दोघींनी गायलेल्या गाण्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होताना दिसत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी, ‘मायलेकींचा आवाज सुंदर आहे’, ‘मुलीचा आवाज खरंच छान आहे’, ‘कसली भारी आहे जान्हवी खूप खूप प्रेम’, ‘वहिनी आवाज गोड आहे तुमचा’, ‘भाऊ, वहिनीचा आवाज खूप गोड आहे’ अशा कमेंट्स केल्या गेल्याचे पाहायला मिळत आहे.
धनंजय पोवारने पूर्वीसुद्धा जान्हवीचे गाणी गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. धनंजय अनेकदा त्याच्या कामासंदर्भातील व्हिडीओदेखील यामार्फत शेअर करीत असतो. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओला त्याचे चाहते भरभरून प्रतिसाद देताना दिसतात.
दरम्यान, धनंजय पोवारबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या सीझन ५ मुळे खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आला. त्यामध्ये तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. ‘बिग बॉस’दम्यान अनेकदा तो चर्चेत असायचा. आताही धनंजय अनेकदा ‘बिग बॉस’मधील इतर कलाकारांच्या संपर्कात असून, अनेकदा त्यांच्याबरोबरचे व्हिडीओ तो पोस्ट करीत असतो.