बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. बिग बॉस मराठीतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. यात तिने शेवंता हे पात्र साकारले होते. अपूर्वा नेमळेकर ही कायमच तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसते. नुकतंच अपूर्वाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट केली आहे.
अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?
“मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण एकट्याने घालवले आहेत. पण त्यावेळी लोकांना वाटायचं की मी ठीक आहे. त्यामुळे मी आता जशी आहे, त्याचा मला अभिमान आहे”, असे कॅप्शन अपूर्वा नेमळेकरने दिले आहे.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…
दरम्यान अपूर्वा नेमळेकरचे वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत असते. अपूर्वा नेमळेकरचा प्रेमविवाह झाला होता. तिचे हे नाते फार काळ टिकले नाही. त्यांचा घटस्फोट झाला. अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव रोहन देशपांडे असे होते. ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांचा विवाह २०१४ मध्ये पार पडला होता. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते.
अपूर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे हे ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले होते. त्या दोघांचा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. ते दोघेही मुंबईत लग्नबंधनात अडकले होते. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.