मनोरंजन क्षेत्रातील कलाकार कोणी लग्नगाठ बांधत आहेत तर कोणी आई बाबा बनत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली तर काही कलाकारांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. आता लवकरच आणखी एका प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आई बनणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा- तुमचं वय किती? चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सई लोकूर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना प्रत्येक घडामोडींची अपडेट देत असते. आता सईने सोशल मीडियावर पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा- ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ मालिका फेम शालिनीची मल्हारसाठी पोस्ट, म्हणाली “तेव्हा तू किती अस्वस्थ…”

सईने आपल्या नवऱ्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये सईचे बेबी बंपही दिसत आहे. सई गरोदर असल्याचे कळताच तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत आहेत. हे फोटो शेअर करत सईने लिहिलं आहे. “हाताची दहा छोटी बोटं, पायाची दहा छोटी बोटं. प्रेम आणि आर्शिवादाने आमचं कुटुंब वाढत आहे. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, एक अती आनंदाची बातमी लवकरच भेटीला येणार आहे.”

तिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच कलाक्षेत्रामधील मंडळीही कमेंटच्या माध्यमातून तिचं अभिनंदन करत आहेत. दरम्यान सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.