scorecardresearch

“माझ्या घरातील भांडी घासून घासून हातावरच्या लक्ष्मण रेषा…” राखी सावंतचा अजब दावा, लग्न न होण्यामागचंही सांगितलं कारण

राखी सावंतने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये काम करण्याबाबत भाष्य केलं आहे. तसेच तिचं लग्न का होत नाही? याबाबतही राखीने सांगितलं.

“माझ्या घरातील भांडी घासून घासून हातावरच्या लक्ष्मण रेषा…” राखी सावंतचा अजब दावा, लग्न न होण्यामागचंही सांगितलं कारण
राखी सावंतने 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये काम करण्याबाबत भाष्य केलं आहे. तसेच तिचं लग्न का होत नाही? याबाबतही राखीने सांगितलं.

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. राखी सावंतसह आणखीन तीन नव्या सदस्यांनी घरामध्ये एन्ट्री केली आहे. राखीने घरात प्रवेश करताच वादाला सुरुवात केली आहे. डायलॉग बाजी करत तिने घरात प्रवेश केला. त्यानंतर तेजस्विनी लोणारी व विशाल निकम यांच्याबरोबर ती वाद घालताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर घरामध्ये काम करणार नसल्याचं राखीचं स्पष्ट मत आहे.

आणखी वाचा – Video : “कोणालाचा झोपू देणार नाही” राखी सावंतचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ड्रामा सुरू, मध्यरात्रीच मागितली कॉफी अन्…

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी राखीने एक मुलाखत दिली. यामध्ये तिने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये जाण्याचंही कारण सांगितलं. शिवाय घरात जाण्यापूर्वीच आपण काम करणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.

राखी म्हणाली, “मी माझ्या घरी खूप काम करते. अहो घरातील भांडी घासून घासून माझ्या हातावरची लक्ष्मण रेषा गेली. घरी पण भांडी घासू आणि ‘बिग बॉस’च्या घरामध्येही भांडी घासू का मी? म्हणून माझं लग्नही होत नाही.”

आणखी वाचा – Bigg Boss 16 : “आता राडा होणार” पुण्याचा गोल्डमॅन सनी वाघचौरेला पाहून घरातील सदस्यही हैराण, अंगावरील सोनं पाहिल्यानंतर म्हणाले…

“आता मी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये काहीच काम करणार नाही. खूप मेकअप करणार, चांगले चांगले कपडे परिधान करणार व दागिने घालणार आणि फक्त बसून राहणार. हिंदी ‘बिग बॉस’नंतर मी मराठी ‘बिग बॉस’मध्ये आली आहे. आता मला थोडातरी आराम नको.” राखी आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये काय काय राडे घालणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:14 IST

संबंधित बातम्या