छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. या कार्यक्रमात सहभागी होणारे अनेक कलाकार आज घराघरात पोहोचले आहेत. याच कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अक्षय केळकर. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नुकतंच त्याने त्याच्या लव्ह लाईफबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासूनच अक्षय केळकर हा सोशल मीडियावर सक्रीय आहे. तो त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : फेसबुकवरील चॅटिंग, बस स्टॉपवरील भेट आणि कुटुंबाचा विरोध; अक्षय केळकरची हटके लव्हस्टोरी

“जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीवर ८ वर्षांपासून प्रेम करता, पण तरीही प्रत्येकवेळी तुम्हाला तिच्या काहीतरी वेगळे असल्याचे जाणवते, याचा अर्थ तेच तुमचे खरे प्रेम आहे. उत्साह, आकर्षण आणि सुंदरता हे नाही, हे म्हणजे सुकून आहे. तुम्हाला ते सापडलंय का?” अशा आशयाची पोस्ट अक्षय केळकरने केली आहे.

आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षय केळकर हा बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सातत्याने चर्चेत होता. हा खेळाडू वृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे त्याने महाराष्ट्राच्या घराघरात एक स्थान निर्माण केले. बिग बॉसच्या घरात गेलेल्या अक्षय केळकरने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उघड केली. अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली.