‘बिग बॉस मराठी’चं चौथे पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात फायटर योगेश जाधव घरातून बाहेर पडला. योगेशचा बिग बॉसमधील प्रवास संपल्यानंतर त्याने घरातील सदस्यांबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक अपूर्वा नेमळेकरबद्दल योगेशने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

योगेश जाधवने नुकतीच ‘ईटाइम्स टीव्ही’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. “घरात खोटं वागणारी व्यक्ती कोण?”, असा प्रश्न योगेशला विचारण्यात आला. यावर उत्तर देत योगेशने अपूर्वा नेमळेकरचं नाव घेतलं. तो म्हणाला, “मला वाटतं अपूर्वा नेमळेकर. ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि बिग बॉसच्या घरातही ती अभिनयच करत आहे. अपूर्वा नेमळेकर या पर्वातील सगळ्यात खोटं वागणारी व्यक्ती आहे. अपूर्वा इतरांना दोषी ठरवून त्यांना खोटारडे म्हणते. पण तीच खोटारडी व्यक्ती आहे. त्यामुळे अपूर्वा हा शो जिंकू शकत नाही”.

हेही वाचा >> “आलिया आणि तिचं बाळ…”, प्रसुतीनंतर सून आणि नातीच्या तब्येतीबाबत नीतू कपूर यांनी दिली माहिती

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”

योगेशने ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण होऊ शकतो, याबद्दलही त्याचं मत मांडलं. “मला वाटतं तेजस्विनी लोणारी हिच्यामध्ये हा शो जिंकण्याची कुवत आहे. तिच्या स्वभावात मला समंजस आणि समतोलपणा दिसतो. त्यामुळे तेजस्विनी हा शो जिंकू शकते”, असं तो म्हणाला.

हेही पाहा >> Photos : ‘वो लडकी है यहाॅं’, सोनाली कुलकर्णीचं शर्टमध्ये हॉट फोटोशूट, नव्या लूकवर चाहतेही फिदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “टीम बीमधील सदस्य ‘बिग बॉस मराठी’च्या फायनलपर्यंत पोहोचावे, अशी माझी इच्छा आहे. या टीममधील प्रत्येक स्पर्धक त्यांचा खेळ उत्तमरित्या खेळत आहे. टीम बीमधील सगळे सदस्य हे खरे स्पर्धक आहेत”. ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व दिवसेंदिवस अधिकच रोमांचक होत आहे. समृद्धी जाधव या आठवड्याची कॅप्टन झाली आहे. तर त्रिशूल मराठेचा या पर्वातील प्रवास संपुष्टात आला आहे.