Ghanshyam Darwade Health Issues :’बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून अनेक जण प्रसिद्धीझोतात आले. त्यापैकी एक म्हणजे छोटा पुढारी. छोटा पुढारीचं खरं नाव घनश्याम दरवडे, असं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात घनश्यामनं चांगलाच राडा केल्याचं पाहायला मिळालं. घनश्यामला अनेकदा त्याच्या कमी उंचीमुळे अपमान आणि ट्रोलिंग सहन करावं लागलं आहे. त्याबद्दल त्यानं अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे.

अशातच घनश्यामनं त्याला लहानपणापासून आजारपण असल्याचंही सांगितलं आहे. घनश्यामला लहानपणापासून किडनी, यकृत व फुप्फुसांसंबंधित आजार आहेत. या आजारपणा तो ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाला. तसेच यावेळी घनश्याम भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं.

याबद्दल घनश्याम म्हणाला, “माझं बालपण हॉस्पिटलमध्येच गेलं आहे. त्यामुळे माझं बालपण आणि तरुणपण आता सुरू आहे. मी सहा वर्षांचा होईपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो. कारण- मला जन्मत:च काही त्रास होता. मला यकृत आणि किडनीचा त्रास होता, अजूनही आहे. माझी उंची कमी असल्यामुळे गावी मला डावललं जायचं; पण त्यावर मात करीत मी पुढे आलो.”

त्यानंतर घनश्यामनं सांगितलं, “मला लोकांनी स्वीकारलं नसलं तरी माझ्या आई-वडिलांनी माझा स्वीकार केला. त्यामुळे मी आता जे काही आहे, ते त्यांच्यामुळेच आहे. सातवीत असताना मला माझ्या आजारपणाबद्दल कळलं. माझ्या वयाच्या सगळ्यांची उंची वाढत होती. त्यामुळे मी माझ्या आई-वडिलांना याबद्दल वारंवार विचारणा करायचो; पण माझे आई-वडील मला तेव्हा काहीही सांगत नव्हते.”

घन:श्याम दरवडे इन्स्टाग्राम पोस्ट

पुढे घनश्याम म्हणाला, “माझी सहनशक्ती संपली. त्यामुळे मी थेट डॉक्टरांनाच याबद्दल विचारलं. कारण- एकीकडे मला समाजाचा त्रास होता आणि त्यात घरचेही काही सांगत नव्हते. त्यामुळे मी थेट डॉक्टरांना विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, मला आनुवंशिकतेचा त्रास आहे. तेव्हाच मला थायरॉईडचा त्रास होता. यकृत व फुप्फुसांना सूज आहे. मी आजही इंजेक्शन घेतो. कारण- माझं रक्त आपोआप तयार होत नाही. रक्त शुद्ध करण्यासाठी मला इंजेक्शन घ्यावं लागतं. त्यात मला क्रिएटीन आहे; त्यामुळे माझ्या किडनीलाही त्रास आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, घनश्यामच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या स्टार प्रवाहवरील शिट्टी वाजली रे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात तो विविध पदार्थ तयार करताना दिसतो. तसेच तो सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय अस., सोशल मीडियाद्वारे तो काही राजकीय आणि सामाजिक विषयांवर व्यक्त होतो.