Suraj Chavan Share Shaky Song Video : सध्या सोशल मीडियावर एका गाण्याची तूफान चर्चा होताना दिसत आहे आणि हे गाणं म्हणजे संजू राठोडचं ‘शेकी’ गाणं. इन्स्टाग्राम रील्स, युट्यूब शॉट्ससह सगळीकडेच ‘शेकी’ हे गाणं वाजताना दिसत आहे. सामान्यांबरोबरच सेलिब्रिटींना या गाण्याने अक्षरश: वेड लावलं आहे. बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीतील अनेकांनी या गाण्यावर डान्स व्हिडीओ केला आहे.
संजू राठोडच्या आधीच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘काली बिंदी’ या गाण्यांनीसुद्धा महाराष्ट्राला वेड लावलं आणि आता त्याचं नवं गाणं ‘शेकी’ सर्वांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. हिंदी ‘बिग बॉस’ गाजवलेली इशा मालवीय या गाण्यात झळकली आहे. एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं हे गाणं बघता बघता अनेकांच्या फेवरिट लिस्टमध्ये सामील झालं आहे.
दरम्यान, संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याची भुरळ ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणलाही पडली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणनेसुद्धा शेकी गाण्यावर रील व्हिडीओ शेअर केला आहे. सूरजने त्याच्या नवीन बाइकसह हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सूरज चव्हाण इन्स्टाग्राम व्हिडीओ
सूरज चव्हाण सोशल मीडियावर आधीपासूनच सक्रीय आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओमुळेच तो लोकप्रिय झाला आणि त्याची ही लोकप्रियता त्याला ‘बिग बॉस’सारख्या शोपर्यंत घेऊन आली. ‘बिग बॉस मराठी’नंतरही तो सोशल मीडियावर आपले अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे, अशातच त्याने संजू राठोडच्या या ट्रेडिंग गाण्यावरचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सूरजने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “नाद केला सूरज भाऊ”, “एकदम कडक”, “ब्रॅंड इज ब्रॅंड”, “एक नंबर” अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये सुरुवातीला गेम न कळणाऱ्या सूरजने अखेर या शोच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
‘बिग बॉस’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सूरज चव्हाण त्याच्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात सूरजने उत्तम अभिनय केला असला तरी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला नाही.